भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांनी प्रचार फेऱ्यांना सुरुवात केली. मतदारसंघातील विविध गावात जाऊन त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांची बहिण खासदार प्रीतम मुंडेही उपस्थित आहेत. यावेळी त्यांनी प्रत्येकाकडे जाऊन उमेदवाराला मत मागावं लागतं, असं म्हटलंय. टीव्ही ९ मराठीशी त्या बोलत होत्या.

दिवसभरात ३००-३१५ किमीचं अतंर कापलं. हे अंतर कापायला जेवढा वेळ लागतो, त्यापेक्षा सातपट जास्त वेळ लागला. रात्री १२ वाजताही संपूर्ण गाव स्वाग करायला हजर होते, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. नारायण गडावर २०१४ मध्ये प्रचाराचा नारळ फुटला होता आणि सत्ता आली होती, असं विचारले असता पंकजा मुंडे म्हणाल्या, सत्ता आताही आहेच. फक्त आता ही सत्ता बीड जिल्ह्याला मिळावी, सामान्य माणसाला मिळावी अशी अपेक्षा करते.

उमेदवारी जाहीर झाल्यापासून प्रीतम मुंडे पंकजा मुंडे यांच्याबरोबर आहेत, याबाबत पंकजा मुंडे म्हणाल्या, त्यांच्या नेतृत्त्वाखालीच मी ही निवडणूक लढवणार आहे. मतदानाकरता सर्वांच्या भेटी घ्यावा लागतात. भारतीय जनता पक्ष मित्र पक्ष आणि विरोधी पक्षानांही भेटत असतं. उमेदवाराला मतं मागावी लागतात. शत्रूच्या दारात जाऊनही मते मागावी लागतात, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

जोशमध्ये होश उडू देऊ नका

दरम्यान, उमेदवारी जाहीर झाल्यापासून पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांचा जोश पाहायला मिळतोय. याबाबत त्या म्हणाल्या, कार्यकर्त्यांचा जोश असाच असला पाहिजे. तरच उमेदवारालाही वाटतं की विजय निश्चित आहे. फक्त या जोशमध्ये कार्यकर्त्यांचे होश नाही गेले पाहिजेत. विजय निश्चित होईपर्यंत कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे, असं आवाहनही पंकजा मुंडे यांनी केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उदयनराजे छत्रपती उमेदवारी मिळण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. परंतु, त्यांची भेट अमित शाहांशी होऊ शकलेली नाही. याबाबत पंकजा मुंडे म्हणाल्या, “प्रत्येक कार्यकर्त्याच्या ट्वीटला मी उत्तर देत बसत नाही. असं राजकारण मी करत नाही.”