VIDEO: नाशिकमध्ये नियंत्रण सुटल्याने वाहन २०० फूट दरीत कोसळले, एकाचा मृत्यू, दोन जण जखमी

नाशिक जिल्ह्यात सिन्नर घोटी महामार्गावरील घोरवड घाटात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन १५० ते २०० फूट खोल दरीमध्ये कोसळले.

Car Accident Nashik Ghoti Video
नाशिकमधील घोटी येथे झालेला कार अपघात…

नाशिक जिल्ह्यात सिन्नर घोटी महामार्गावरील घोरवड घाटात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन १५० ते २०० फूट खोल दरीमध्ये कोसळले. या अपघातात एक जणाचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झालेत.

टाटा टियागो गाडीतील प्रवासी सिन्नरकडून घोटीकडे जात होते. त्यावेळी घोरवड घाटामध्ये वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यामुळे ही कार थेट दीडशे ते दोनशे फूट खोल दरीमध्ये कोसळली.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : नाशिकमध्ये भाजीपाला पिकअप आणि लग्झरीत भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Car accident on sinnar ghoti highway by falling in valley in nashik pbs

Next Story
Weather Forecast : मुंबईत मान्सूनचे आगमन, ठाण्यापासून पुण्यापर्यंत पावसाच्या सरी; जाणून घ्या हवामान विभागाचा ताजा अंदाज
फोटो गॅलरी