वर्धा येथील देवळीचे काँग्रेसचे आमदार व माजी आरोग्य राज्यमंत्री रणजित कांबळे यांच्या विरोधात देवळी पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवळीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण धमाणे यांनी आमदार रणजित कांबळेंकडून अश्लील शिवीगाळ करण्यात आल्याची तक्रार केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकरणी ठाणेदार तिरुपती राणे अधिक तपास करत आहेत. यापूर्वी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अजय डवले यांनी तक्रार केल्यानंतर वर्धा शहर पोलिसांनी आमदार कांबळे यांच्या विरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल केला असुन, चौकशी सुरू आहे.

आरोग्य अधिकाऱ्यास धमकावल्याप्रकरणी आमदार रणजित कांबळेंवर गुन्हा दाखल!

देवळी लगत असलेल्या नाचन गाव येथे करोना चाचणी शिबीर नियमबाह्य घेतल्याचा कांबळे यांचा आक्षेप आहे. भाजपा जि.प. सदस्य व अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या या शिबिराचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आमदार कांबळे प्रचंड संतप्त झाले होते. त्यानंतर त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना धमकावंत, अधिकारी राजकारण करत असल्याबद्दल राग व्यक्त केल्याचे ध्वनिफीतून समोर आले होते.

“रणजित कांबळेंनी अनेक अधिकाऱ्यांना धमक्या दिल्यात, त्यांना त्वरीत अटक करा”

दरम्यान, डॉ. डवले यांनी या प्रकरणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर आता वर्धा जिल्ह्यातील राजकारण तापताना दिसत आहे. भाजपाचे खासदार रामदास तडस यांनी कांबळे यांना अटक करण्याची मागणी केली असून, याचा थेट परिणाम आरोग्य यंत्रणेवर होईल, असा इशारा खासदार तडस यांनी दिला आहे.

“तुला चपलेनं मारलं नाही, तर माझं नाव रणजित नाही”; काँग्रेस आमदाराची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ

राज्यात करोनाच्या संकटामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. डॉक्टरांसह वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दररोज नवनव्या समस्यांना सामोरं जावं लागत असून, नातेवाईकांकडूनही हल्ले आणि असभ्य वागणूक दिल्याच्या घटना समोर येत आहे. मात्र, वर्ध्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांनी थेट जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. शिवीगाळ केल्याच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी थेट जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीसअधीक्षकांना तक्रार दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case filed against mla ranjit kamble at deoli police station msr
First published on: 11-05-2021 at 21:46 IST