राज्याच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंबोज सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता तुरुंगात जाणार असल्याचं ट्विट करत कंबोज यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर त्यांनी, रोहित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत निशाणा साधला होता. आता, कंबोज यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांना लक्ष्य केलं आहे. कंबोज आणि विद्या चव्हाण यांच्यात ट्वीटवर वॉर सुरू झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आता, हा वाद पोलीस स्थानकापर्यंत पोहचला आहे. मोहित कंबोज यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विद्या चव्हाण यांच्यावर सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- “शरद पवारांमध्ये इतकी ऊर्जा येते कुठून?”; रोहित पवारांनाही पडला प्रश्न; ट्वीट करत म्हणाले….

मोहित कंबोज आणि किरीट सोमय्या यांना गुजरातमध्ये पाठवण्याची विद्या चव्हाणांची मागणी

विद्या चव्हाण यांच्याविरुद्ध भादंवि ५०५ (२), ३७ (१), १३५ आणि ५०० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहित कंबोज असतील किंवा ते किरीट सोमय्या त्यांना गुजरातमध्ये पाठवून द्या, महाराष्ट्रात त्यांच आता काही काम नाही. त्यांनी गुजरातमध्ये जावे. इथे चौकशी करु नये. गुजरातमध्ये अनेक मोठमोठ्या डायमंडचा व्यापार आहे, लोकांचे उद्योग- धंदे आहेत. त्यांची चौकशी करावी. महाराष्ट्रात आम्ही लोक आहोत, आम्ही चौकशी करू, आमचं काय करायचंय ते करू. गृहमंत्री प्रामाणिक लोकांच्या चौकशा लावतात, आणि गुन्हेगार लोकांना मंत्रीपदं दिले जाते, असे विधान विद्या चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले होते.

हेही वाचा- …तर सर्वच राज्यात आमदारांची फोडाफोडी! ; सत्ता संघर्षावरील निकाल लांबल्याने जयंत पाटलांकडून चिंता व्यक्त

मोहित कंबोज ठगी करणारा माणूस

बांद्रा येथे मोहित भारतीय म्हणून मोठे पोस्टर लावले होते. मोहित कंबोज ठगी करणारा माणूस आहे. स्वत:च नावसुद्धा बदलणारा माणूस आहे. यापूर्वी नबाब मलिकांनी त्यांच्या कामाचा पोलखोल केला होता. चित्रपटसृष्टीतील लोकांना डॅग्रस पुरवण्यामध्ये मोहित कंबोज यांचा हात आहे. आज कंबोज यांना तुरुंगात असायला हवं होतं. मात्र, ते स्वत: ईडीचे एक खास एजंट असल्यासारखं आणि गृहमंत्र्यांचा खास व्यक्त असल्यासारखं वावरत आहेत, असा टोलाही विद्या चव्हाण यांनी लगावला आहे.