शिक्षक पात्रता चाचणी अर्थात टीईटी घोटाळ्यात माजी मंत्री तथा शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे समोर आली असून त्यांची प्रमाणपत्रं रद्द करण्यात आली आहेत. या प्रकरणामुळे सत्तार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. माझ्या मुलींनी कोठे अर्ज केला असेल तसेच पगार मागितला असेल तर त्या दोषी आहेत, असे म्हणत माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय, असे स्पष्टीकरण सत्तार यांनी दिले आहे. तर दुसरीकडे टीईटी घोटाळ्यात सत्तार यांच्या मुलींची नावे आल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटातील नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी तर टीईटी घोटाळ्यातील मूळ आरोपीस सुळावर चढवा, अशी मागणी केली आहे. एबीपी माझाने तसे वृत्त दिले आहे.

हेही वाचा >>> “माझ्या परिवाराची चूक असेल तर मी गुन्हेगार आहे, नाही तर…”, टीईटी घोटाळा प्रकरणी अब्दुल सत्तारांचं स्पष्टीकरण!

Jayant Patil on Ajit Pawar comparision to Modi- Shah
‘तुलना कुणाशी करायची, याचं भान…’, अजित पवारांच्या ‘त्या’ दाव्यानंतर जयंत पाटील यांचा टोला
dombivli, akhil bhartiya brahman mahasangh
जातीय तेढ निर्माण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करा, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश
pm Modi Yavatmal
पंतप्रधानांची यवतमाळमध्ये सभा, पोलिसांनी कशासाठी बजावली नोटीस?

“भारतीय जनता पार्टी शिस्तबद्ध पक्ष आहे. त्यांच्या अधिपत्याखाली हे सरकार आले आहे. अब्दुल सत्तार यांचा प्रत्यक्षात दोष नसेल तर सीआयडी चौकशी करायला हवी. सत्तार यांनी जर हे केले नसेल तर ज्याने हा मूळ घोटाळा केलेला आहे त्याला सुळावर लटकवायला हवं. त्याला पकडायला हवं. या घोटाळ्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे सरकारने या घोटाळ्याची गंभीर चौकशी करावी,” अशी मागणी खैरे यांनी केली.

हेही वाचा >>> विश्लेषण : मराठमोळा धावपटू अविनाश साबळे केनियन वर्चस्वाला कसे देतोय आव्हान?

तसेच, “टीईटी घोटाळ्यासंदर्भात मी त्यांची आताच मुलाखत पाहिली. त्यांच्या अनेक शाळा आहेत. या घोटाळ्याची चौकशी केंद्रीय अधिकाऱ्यांनी केली आहे. ही चौकशी करतच ते सिल्लोडपर्यंत पोहोचले आहेत. महत्त्वाचं म्हणजे ही शाळा त्यांचीच आहेत. त्यामुळे फक्त त्यांच्याच मुलींचे नावं आहेत, की आणखी मुलींचा समावेश आहे, याची चौकशी व्हायला पाहिजे” असेदेखील चंद्रकांत खैरे म्हणाले.

हेही वाचा >>> Commonwealth Games 2022: सुवर्ण-रौप्य पदक खरंच सोने आणि चांदीचे असतात का? जाणून घ्या, मेडल्स बनवण्यामागची गोष्ट

“माझ्याकडे एकूण १६ वृत्तपत्र येतात. मी त्यातील कात्रण काढून ठेवत असतो. अब्दुल सत्तारांच्या घोटाळ्याचीही कात्रणे मी काढून ठेवली आहेत. त्याची संपूर्ण फाईल माझ्याकडे आहे. त्यामुळे माझं त्यांना एवढंच सांगणं आहे, की त्यांनी आता उगाच बडबड करू नये. आता त्यांनी शांत राहावं. जे चौकशीत पुढे यायचं ते येईलच”, असेदेखील चंद्रकांत खैरै म्हणाले.