चंद्रपूर : दिवसभरात आढळले ११ करोनाबाधित रुग्ण; एकूण संख्या पोहोचली ३९ वर

जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी आत्तापर्यंत २२ बाधित रुग्ण बरे

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज एकाच दिवशी ११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ३९वर पोहोचली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी ही माहिती दिली.

आरोग्यविभागाच्या माहितीनुसार, आजच्या रुग्णांमध्ये मुंबई, नवी दिल्ली, जळगाव, यवतमाळ, ओडिशा तसेच यवतमाळ येथून आलेला प्रत्येकी एकजण तसेच ब्रह्मपुरी तालुक्यातील अड्याळ टेकडी येथील पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील दोन व्यक्तींसह ब्रह्मपुरी येथील कोविड १९ केअर सेंटरमधील संस्थात्मक अलगीकरणात असणाऱ्या एकूण पाच व्यक्तींचा समावेश आहे.

यांपैकी अड्याळ टेकडी येथील संपर्कातील दोघांना वगळता अन्य ३ नागरिकांमध्ये मुंबईवरून आलेला ४३ वर्षाचा व २७ वर्षाचा पुरूष आहे. तर गुजरातमधून आलेला पुंड सावली येथील एक व्यक्ती आहे.

जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी आत्तापर्यंत २२ बाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे ३९ पैकी १७ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Chandrapur 11 corona patients found in a day the total number reached 39 aau