चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील वणी खूर्द येथील अमानुष मारहाण प्रकरणात पोलिसांचे अटकसत्र सुरू असतानाच नागभीड तालुक्यातील मिंडाळा टोली येथे जादूटोण्याच्या संशयावरून लोखंडी रॉडला बांधून मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागभीड तालुक्यातील मिंडाळा टोली येथे मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास जादूटोणा करीत असल्याच्या संशयावरून आरोपींनी फिर्यादीला मारहाण केली. तर फिर्यादीच्या मुलाला मोटारसायकलने बळजबरीने आणून घरासमोरील पाण्याच्या टाकीच्या लोखंडी रॉडला दोरीने बांधून बॅट व बांबूने मारहाण केली. फिर्यादीलाही काठीने मारून जखमी केले. दरम्यान, मंगळवारी फिर्यादीकडे कोणतेही साधन नसल्याने तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले नाही. बुधवारी या प्रकरणी नागभीड पोलीस ठाण्यात दिलेल्या तोंडी तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहे.सदर प्रकरणाची तक्रार दाखल होताच नागभीड पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले व तपास करून आरोपींना ताब्यात घेतले. सध्या गावात शांतता कायम असून, पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, एसडीपीओ मिलींद शिंदे यांनी मिंडाळा येथे बुधवारी भेट देवून गावातील जनतेला मार्गदर्शन करीत शांतता राखण्याचे आवाहन केले. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात एका पाठोपाठ एक जादूटोण्याच्या संशयावरून समोर येत असलेल्या घटनांमुळे पोलीस प्रशासनातही चांगलीच खळबळ उडाली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur beating by tying an iron rod on suspicion of black magic five accused arrested rmt
First published on: 01-09-2021 at 22:34 IST