काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील सर्व प्रमुख वर्तमान पत्रांच्या पहिल्या पानावर एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीत एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील जनतेकडून मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंती मिळाली असल्याचं एका सर्वेक्षणात दिसून आल्याचा दावा करण्यात आल होता. यात एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपेक्षा अधिक लोकप्रिय नेते असल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच यापूर्वीच्या प्रत्येक जाहिरातीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे एकत्र फोटो असायचे, परंतु या जाहिरातीत केवळ एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांचेच फोटो होते.

ही जाहिरात ‘राष्ट्रात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदे’ अशा मथळ्याखाली प्रसिद्ध करण्यात आली होती. यापूर्वी भारतीय जनता पार्टी तसेच एनडीएतील पक्ष देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशी घोषणा द्यायचे. परंतु एकनाथ शिंदे यांच्या जाहिरातीतल्या नव्या घोषणेने देवेंद्र फडणवीसांची घोषणा मागे राहिली. त्यामुळे राज्यात वेगवेगळ्या राजकीय चर्चांणा उधाण आलं आहे. तसेच या जाहिरातीमुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात मतभेद निर्माण झाले असल्याची चर्चा आहे. यावर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला की, त्या जाहिरात प्रकरणामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत का? यावर बावनकुळे म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे मोठ्या मनाचे नेते आहेत. देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे हे या अशा छोट्या मोठ्या जाहिरातींमुळे ज्यांचे संबंध खराब होतील असे नेते नाहीत. दोघेही विचारांनी खूप मोठे आणि प्रगल्भ आहेत.

हे ही वाचा >> “शरद पवार केव्हाही डबल गेम…”, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला; म्हणाले, “त्यांनी सरकार बसवताना, पाडताना…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे त्या जाहिराती कोणी छापल्या? चुकीच्या छापल्या का? यावर त्या दोघांमध्ये काही किंतू, परंतु, जंतू नाहीत. त्यांच्या मनात काही येईल असंही होणार नाही. दोघेही महाराष्ट्राला न्याय देत आहेत. राज्यात उत्तम सरकार काम करत आहे.