भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका आणि स्त्रीशिक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज १९२ वी जयंती आहे. यानिमित्त देशभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव असलेल्या साताऱ्यातल्या नायगावात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नायगावात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंचं स्मृतीस्थळ आहे. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या स्मृतीस्थळी जाऊन महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केलं. भुजबळ यांच्याबरोबर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरही उपस्थित होत्या.

दरम्यान, छगन भुजबळांनी फुले दाम्पत्याच्या स्मारकाला अभिवादन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट आक्रमक झाला आहे. भुजबळ आणि चाकणकर नायगावातून निघाल्यानंतर शरद पवार गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंच्या पुतळ्यांना दुग्धाभिषेक केला. संपूर्ण स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केलं. दरम्यान, यावेळी स्मारक परिसरात तणाव निर्माण झाला होता.

शरद पवार गटातील कार्यकर्ते म्हणाले, ज्या वृत्तीने, मनुवादी विचाराने ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाईला त्रास दिला, ज्यांनी फुले दाम्पत्याची नाहक बदनामी केली, अशा वृत्तीच्या लोकांबरोबर जाऊन हे लोक (भुजबळ आणि अजित पवार गट) मंत्रिपद भोगत आहेत. स्वतःच्या लालसेपोटी, त्यांच्यावर असलेले आरोप लपवण्यासाठी आणि केवळ मंत्रिपदासाठी हे लोक सत्तेत जाऊन बसले आहेत. हे लोक आज इथे आल्याने हे स्मृतीस्थळ अपवित्र झालं आहे. त्यामुळे आम्ही या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे ही वाचा >> जयंत पाटलांबरोबरच्या वादामुळे रोहित पवार पक्षाच्या शिबिराला गैरहजर? प्रदेशाध्यक्ष म्हणाले, “जे सोबत येतील…”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या औद्योगिक सेलचे अध्यक्ष बंडू ढमाळ म्हणाले, महाराष्ट्र सदनात छगन भुजबळ यांनी घोटाळा केला आहे. त्यांचा हात पवित्र स्मृतीस लागला म्हणून आम्ही हे आंदोलन करत आहोत.