दिल्ली मुंबई औद्योगिक पट्ट्यात येणा-या भागांतील पायाभूत विकासासाठी महाराष्ट्र सरकारने तब्बल १,००,००० कोटींच्या प्रकल्पांना मंजूरी दिल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्ट्यात येणा-या औरंगाबादमधील शेंद्रे भागाच्या विकासासाठी गुंतवणूक करण्यासाठी तयार असलेल्या तब्बल ३६ कंपन्यांबरोबर महाराष्ट्र सरकारने सामंजस्य-करार केले आहेत. यामध्ये मुख्यत्वेकरून पायाभूत सोयींच्या विकासावर भर देण्यात येणार आहे. यासाठी तब्बल १,००,००० कोटींची गुंतवणूक होणे महाराष्ट्र सरकारला अपेक्षित आहे. या महत्वकांक्षी प्रकल्पामुळे देशाची आर्थिक राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई यादरम्यान असणा-या भागांध्ये उत्पादन प्रक्रियेला चालना मिळेल. दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्ट्यातंर्गत मराठवाड्यातील औरंगाबादजवळ असणा-या शेंद्रे-बिडकीन पट्ट्याचा विकास करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 14th Feb 2014 रोजी प्रकाशित
दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्ट्यातील विकासकामांसाठी कोटींचे करार
दिल्ली मुंबई औद्योगिक पट्ट्यात येणा-या भागांतील पायाभूत विकासासाठी महाराष्ट्र सरकारने तब्बल १,००,००० कोटींच्या प्रकल्पांना मंजूरी दिल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.
First published on: 14-02-2014 at 06:52 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chavan promises 36 mous worth rs 1 trln by feb end in dmic