राष्ट्रवादीचे बडे नेते अशी छगन भुजबळ यांची ओळख आहे. याच छगन भुजबळ यांची चांगलीच चर्चा गेल्या काही महिन्यांपासून रंगली आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात घेतलेली भूमिका. ओबीसींच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देऊ नका त्यांना वेगळं आरक्षण द्या अशी भूमिका छगन भुजबळ यांनी सातत्याने घेतली आहे. तसंच मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा आरक्षण मिळवल्याचा दावा केला तेव्हा त्यावरही त्यांनी आक्षेप घेतला. येत्या काही दिवसात छगन भुजबळ हे ओबीसींची सभाही घेणार आहेत. अशात छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेचं कारणही तसंच आहे.

शिंदे गटाच्या दोन आमदारांनी केली छगन भुजबळांच्या हकालपट्टीची मागणी

मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतल्या मोर्चाला मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं पुन्हा एकदा सांगितलं. मात्र छगन भुजबळ यांनी ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध दर्शवला. मराठा आरक्षणावरुन छगन भुजबळ हे मंत्रिपदाचा राजीनामा देऊ शकतात अशीही चर्चा सुरु आहे. अशात बुधवारी शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि संजय शिरसाट या दोन्ही नेत्यांनी मंत्रिमंडळातून छगन भुजबळ यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली होती. यानंतर दुसऱ्याच दिवशी छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली. याचं महत्त्वाचं कारण आहे अंजली दमानिया यांनी केलेली पोस्ट.

loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
PM Modi, Manipur, PM Narendra Modi,
मोदीजी म्हणतात, मणिपूरप्रश्नी वेळीच हस्तक्षेप केला… खरंच?
chhagan bujbal
“माझा निर्णय दिल्लीतून ठरला, मात्र…”; नाशिकच्या उमेदवारीबाबत छगन भुजबळांचे विधान
government and government parties on social media viral claim false
आचारसंहितेनंतर सोशल मीडियावर सरकार, राजकीय पक्षांविरोधात लिहिणाऱ्यांवर होणार कारवाई? व्हायरल दावा खरा की खोटा, वाचा

हे पण वाचा- “मनोज जरांगे पाटील यांच्यात हिंमत असेल तर..”, छगन भुजबळ यांचा थेट इशारा

काय आहे अंजली दमानियांची पोस्ट?

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही वेळापूर्वीच एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये अंजली दमानिया म्हणतात, “भुजबळ भाजपाच्या वाटेवर?, एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजपा त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप” अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे. त्यामुळे छगन भुजबळ हे भाजपाच्या वाटेवर आहेत का? अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे.

छगन भुजबळ यांनी त्यांच्या राजकीय आयुष्याची सुरुवात ही शिवसेना या पक्षापासून केली होती. शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख होती. शिवसेनेला सोडचिठ्ठी देणारे ते पहिले बंडखोर होते. बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक वर्षे त्यांचा उल्लेख लखोबा लोखंडे असा केला होता. १९९१ मध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये त्यांनी शरद पवारांसह जात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर सध्या ते अजित पवार गटात आहेत. २ जुलै २०२३ या दिवशी त्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली होती. सध्या छगन भुजबळ राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आहेत. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना छगन भुजबळ यांनी १ नोव्हेंबर १९९२ रोजी केली होती. आता राष्ट्रवादी सोडून छगन भुजबळ भाजपात जाणार का? याची चर्चा अंजली दमानियांच्या पोस्टमुळे रंगली आहे.