scorecardresearch

“बाळासाहेब थोरातांनी आता बोललं पाहिजे,” सत्यजीत तांबेंच्या आरोपानंतर भुजबळांचे विधान; म्हणाले, “काय घडलं हे फक्त…”

अपक्ष आमदार तथा काँग्रेसचे माजी नेते सत्यजीत तांबे यांनी प्रदेश काँग्रेस तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

chhagan bhujbal and satyajeet tambe and balasaheb thorat
छगन भुजबळ, सत्यजीत तांबे, बाळासाहेब थोरात (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अपक्ष आमदार तथा काँग्रेसचे माजी नेते सत्यजीत तांबे यांनी प्रदेश काँग्रेस तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तांबे कुटुंब तसेच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना बदनाम करण्यासाठी कट रचण्यात आला, असे सत्यजीत तांबे म्हणाले आहेत. या खळबळजनक आरोपानंतर सत्यजीत तांबे काँग्रेसमध्ये परतणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. यावरच आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज (५ फेब्रुवारी) माध्यम प्रतिनीधींशी बोलत होते.

हेही वाचा >>> सत्यजीत तांबेंच्या आरोपांनंतर छगन भुजबळांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले “शरद पवारांनी अगोदरच…”

बाळासाहेब थोरात यांनी याबाबत बोललं पाहिजे

“सत्यजीत तांबे यांना काँग्रेस पक्ष सोडायचा असेल तर ते काँग्रेसवर टीका करणारच. नाना पटोलेंवर जे आरोप झाले, त्याला ते (नाना पटोले) उत्तर देतीलच. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी याबाबत बोललं पाहिजे. यामध्ये नेमकं काय घडलं? हे फक्त बाळासाहेब थोरात सांगू शकतात. असे मला वाटते. सत्यजीत तांबे ज्या पद्धतीने आरोप करत आहेत, ते पाहता त्यांचा काँग्रेसमध्ये परण्याचा हेतू आहे, असे मला वाटत नाही,” असे छगन भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितले.

हेही वाचा >>> पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी दीपक केसरकरांचे शरद पवारांना आवाहन, म्हणाले “पवारसाहेब सर्वांचेच…”

मचे नेते एकत्र बसतील आणि मगच…

छगन भुजबळ यांनी विधानसभेच्या कसबा, चिंचवड या पोटनिवडणुकीवरही भाष्य केले. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मला फोन आला होता. मात्र आमचे नेते एकत्र बसतील आणि मग ही निवडणूक बिनविरोध करायची की नाही ते ठरवतील. आमचे शीर्षस्थ नेते यावर निर्णय घेतील. यावर चर्चा झालेली आहे. लवकरच निर्णय घेतला जाईल,” असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 14:09 IST