शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं की, मी मराठा समाजाला आरक्षण देईन. त्यानंतर अनेक महिने मराठा समाजाचं आंदोलन चाललं. अखेर २७ जानेवारी २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईच्या वेशीवर (वाशी, नवी मुंबई) दाखल झालेल्या मराठा मोर्चाला सामोरे गेले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलकांच्या अनेक मागण्या मान्य करून त्यासंबंधीची अधिसूचना मराठा आंदोलकांचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य करत कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजातील लोकांचा ओबीसीत समावेश केला जाईल हे स्पष्ट केलं. त्यानंतर राज्यातल्या ओबीसी नेत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकारविरोधात भूमिका घेतली आहे.

ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात शनिवारी (३ फेब्रुवारी) अहमदनगर येथे ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ यांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका मांडली. तसेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनांही टोला लगावला.

PM Narendra Modi in Nagpur
पंतप्रधान नागपुरात, शनिवारी भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा
Narayan Rane, Vinayak Raut,
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ‘कडवट’ माजी-आजी शिवसैनिकांमध्ये लढत
Mahayuti gathering in Washim, Gyayak Patni,
महायुतीचा मेळावा : मंत्री व पालकमंत्री उपस्थित अन् खुर्चीवरून वाद !
Jalgaon district president of Ajit Pawar group sanjay pawar criticizes Eknath Khadses surrender to avoid imprisonment
एकनाथ खडसेंची शरणागती तुरुंगवारी टाळण्यासाठीच, अजित पवार गटाच्या जळगाव जिल्हाध्यक्षांची टीका

छगन भुजबळ म्हणाले, मला मुख्यमंत्र्याचा अपमान करायचा नाही. परंतु, माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे. २७ जानेवारी रोजी मुख्यमंत्री वाशी येथे मराठा मोर्चाला सामोरे गेले. तिथे तुम्ही (एकनाथ शिंदे) जाहीर केलंत की, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती की सर्व मराठा समाजाला आरक्षण देईन, ती शपथ आता पूर्ण केली. परंतु, आता मला प्रश्न पडला आहे की तुम्ही जर मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ तुम्ही पूर्ण केली आहे तर हा ओबीसी आयोग कशासाठी नेमला आहे? या ओबीसी आयोगामार्फत जे सर्वेक्षण केलं जातंय ते कशासाठी करत आहात. मराठा समाजाला आरक्षण मिळालं आहे ना? तुम्ही म्हणालात शपथ पूर्ण झाली, मग या आयोगाचं सर्वेक्षण चाललं आहे ते कशासाठी. हे तद्दन खोटं सर्वेक्षण कशासाठी करताय?

हे ही वाचा >> छगन भुजबळांच्या राजीनाम्यावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी त्यांचा…”

भुजबळांची फडणवीसांवर नाराजी

दरम्यान, गृहविभागावर नाराजी व्यक्त करत छगन भुजबळ म्हणाले, “श्रीगोंद्यात ओबीसी एल्गार सभेची पूर्वतयारी सुरू असताना तिथे पोलीस पाठवण्यात आले आणि काम थांबवण्यात आलं. पोलिसांकरवी ओबीसी समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांना नोटीसा पाठवल्या जात आहेत. हे सगळं नेमकं काय चाललंय?” याप्रकरणी भुजबळांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारला. भुजबळ म्हणाले, देवेंद्र फडणवीस साहेब, हे सगळं काय चाललंय. तुमच्या गृह विभागाला सांगा की तुमच्याकडून असा भेदभाव होता कामा नये. जे काही नियमाने असेल ते सगळ्यांनी करावं. आम्हाला एक न्याय आणि त्यांना रात्री ३ वाजता सभेची परवानगी कशी मिळते? मराठा समाजातील लोकांची सभा रात्री दोन वाजता होते, त्यांना परवानगी कशी काय दिली जाते. त्यांच्यावर कारवाई का होत नाही. कुठलेही पोलीस त्यांच्यावर कारवाई का करत नाहीत?