मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात गेल्या महिन्याभरापासून संघर्ष चालू आहे. दोघेही सातत्याने एकमेकांवर टीका करत आहेत. “टोळी मुकादमाला आता घरी बसवल्याशिवाय शांत बसणार नाही, म्हातारा झाला असला तरी त्याची खूप गडबड चालू आहे”. असं म्हणत नाव न घेता मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली होती. या टीकेला छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं. हिंगोली येथे आयोजित ओबीसी एल्गार सभेत ते बोलत होते.

छगन भुजबळ म्हणाले, “ते नवीन नेते आता नवीनच काहीतरी बोलू लागले आहेत. भुजबळ म्हातारे झालेत असं काल म्हणाले. अरे बाबा हो! झालोय म्हातारा, सगळेच होणार आहेत. तुझे माता-पिता म्हातारे झाले असतील. तूसुद्धा म्हातारा होशील.” भुजबळ यावेळी डोक्यावरचे केस पकडून म्हणाले, मला म्हातारा म्हणतोय, पण माझ्या डोक्यावरचे केस एका आंदोलनाने पिकले नाहीत. माझ्या डोक्यावर जेवढे केस आहेत तेवढी आंदोलनं मी केली आहेत. मी कधी जीवाची पर्वा केली नाही. आंदोलन माझ्यासाठी नवीन नाही.

ओबीसी नेते छगन भुजबळ म्हणाले, या लोकांनी बीड पेटवलं. यांना मला सांगायचं आहे की पेटवायला अक्कल लागत नाही, पटवायला अक्कल लागते. जाळायला अक्कल लागत नाही, जुळवायला अक्कल लागते. मोडायला अक्कल लागत नाही, घडवायला अक्कल लागते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे ही वाचा >> प्रकाश आंबेडकरांचा ओबीसी नेत्यांना इशारा, छगन भुजबळ म्हणाले, “मी त्यांना सांगू इच्छितो की…”

अहमदनगर येथील शेवगावमध्ये दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांची सभा झाली. या सभेत मनोज जरांगे पाटील म्हणाले होते की, टोळी मुकादम म्हातारा झाला तरी त्याची खूप गडबड चालू आहे. त्यांना तंबी देणाऱ्या अजित पवारांना माझं सांगणं आहे की ते शांत बसले नाहीत तर मीही शांत बसणार नाही.