छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि जगदंब तलवार महाराष्ट्राच्या मातीत दर्शनासाठी येणार आहेत. त्याबाबतची मोठी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केली. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने प्रस्तावना सादर करताना सुधीर मुनगंटीवारांनी ही मोठी घोषणा केली. तसंच, छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळाही भव्यदिव्य करणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी आज केला.

हेही वाचा >> आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने होणार सन्मान; खारघरमध्ये महासोहळ्याची जय्यत तयारी!

“अफझल खानचे उदात्तीकरण करण्यासाठी अतिक्रमण करण्यात आलं होतं. १९५३ पासून कोणतंच सरकार अतिक्रमण हटवत नव्हतं. पंरतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने हे अतिक्रमण हटवून तेथे ‘जय भवानी जय शिवाजी’चा जयघोष करण्याचा आपल्याला भाग्य दिले”, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. ते पुढे म्हणाले की, “हॅलो नाही, वंदे मातरम् हे मी अमित शाहांच्या कार्यालयातून शिकलो. तुमच्या कार्यालयात केव्हाही फोन केला तर हॅलोएवजी वंदे मातरम् म्हटलं जातं. आज मी मोठ्या अभिमानाने सांगतो की रायगडची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा राज्यभिषेक मोठ्या धामधुमीत येथे साजरा करणार आहेत. यापेक्षाही मोठी बाब अशी आहे की काल, ब्रिटिश काऊंन्सिलेटशी आमची चर्चा झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आणि जगदंब तलवार महाराष्ट्रातील जनतेसाठी दर्शनाकरता उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.”

हेही वाचा >> महाराष्ट्र भूषण अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याची व्याप्ती कोणत्या क्षेत्रांत? त्यांचा अनुयायी परिवार किती?

मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आम्ही ब्रिटनला जात आहोत. आमचा प्रयत्न असेल की रायगड भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात अशा पद्धतीने साजरा करू की त्यामुळे सगळे देशाला सलाम आणि नमन करतील, असंही पुढे सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा >> महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा: रणरणत्या उन्हात श्री सदस्यांचा उत्साह शिगेला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एक वैचारिक गंगोत्री

ज्येष्ठ निरुपणकार आणि पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत आले आहेत. खारघरच्या आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानात हा भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून लाखो लोकांनी या सोहळ्यात हजेरी लावली आहे. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांना वैचारिक गंगोत्रीची उपमा दिली. ते म्हणाले की, मना सज्जना भक्तिपंथेचि जावें। तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥ जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें। जनीं वंद्य ते सर्व भावे करावे|| एक वैचारिक गंगोत्री. आप्पासाहेबांचा हा निरुपणाचा भक्तीसागर बघण्याचा योग मला मिळाला. धन्य झालो मी, धन्य झाला सांस्कृतिक कार्यविभाग आणि धन्य झाला महाराष्ट्र शासन. धन्य झाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार, अशा शब्दांत मुनगंटीवारांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याचा गौरव केला.