मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ४० आमदारांसह पुन्हा गुवाहाटीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. एका कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंनी गुवाहाटीला जाणार असल्याचं सांगितलं होतं. आता २० नोव्हेंबरला एकनाथ शिंदे सर्व आमदारांसह गुवाहाटीला जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान सर्व आमदार कामाख्या देवीचं दर्शन घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेत बंड केलं. मुंबईतून गेल्यावर तीन आठवड्यांच्या कार्यकाळात गुजरातनंतर एकनाथ शिंदेंसह सर्व बंडखोर आमदार गुवाहाटीला मुक्कामाला होते. येथे कामाख्या देवीच्या दर्शनाला जाताना सर्व बंडखोर आमदारांनी मोठं शक्तीप्रदर्शनही केलं. त्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि सत्तांतर झालं.

हेही वाचा : “पुन्हा एक नटवरलाल देश विकू पाहतोय”; अबू आझमींचा पंतप्रधानांवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यातच आता राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या आमदारांसह २० नोव्हेंबरला गुवाहाटीला जाणार आहेत. या दौऱ्यात सत्तांतराच्या काळात मदत करणाऱ्यांची भेट घेणार आहेत. तसेच, कामाख्या देवीच्या मंदिरात पुजेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. टीव्ही ९ मराठीने याबाबत वृत्त दिलं आहे.