महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम यांच्या प्रचारार्थ हिंगोलीतील वसमतमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “फेसबुक लाईव्ह करुन सरकार चालवता यते नाही. आम्ही राजकारणात जेवढे वर्ष काम केले तेवढे त्यांचे वयदेखील नाही. त्यांची सत्ता गेल्यामुळे ते सैरभैर झाले आहेत. बाप एक नंबरी बेटा दस नंबरी असे काम त्यांचे झाले आहे”, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लगावला.

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

“देशात गेल्या ५० वर्षांपासून गरीबी हटावचा नारा देणाऱ्या पक्षाने नारा दिला. पण गरीबी हटली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २५ कोटी जनतेला गरीबीतून वर आणले आहे. गेल्या ५० ते ६० वर्षात जे काम झाले नाही ते गेल्या १० वर्षात झाले आहे. आज १० वर्षात केलेला कारभार आणि ५० वर्षात त्यांनी (काँग्रेसने) केलेला कारभार पाहा. जर याची तुलना केली तर १० वर्षांची उंची ही एका हिमालयाएवढी वर जाईल आणि ५० वर्षांची एवढी छोटी टेकडी दिसेल”, असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर केला.

PM Modi on Arvind Kejriwal
“आपचे नेते दिल्लीत बसून पंजाबवर…”; पंतप्रधान मोदींचा अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल
CM Eknath Shinde To Uddhav Thackeray
“तोंडावर कधीच आपटलेत, आता त्यांची तोंड फुटतील”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
sushil kumar modi passes away
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन
Will Uddhav Thackeray be taken with BJP Chief Minister Eknath Shinde reply pune
उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत घेणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…
Uddhav Thackeray and Sanjay Shirsat
संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले, “दाढीवाल्यांच्या नादी…”
CM Eknath Shinde
“दिल्ली गाजवणार मुंडेसाहेबांची लेक, कुठून आली तुतारी…”; मुख्यमंत्री शिंदेंचा कवितेतून विरोधकांवर हल्लाबोल
Thanks to Narendra Modi and Amit Shah for giving Shiv Sena and dhanushyaban says Chief Minister Eknath Shinde
शिवसेना आणि धनुष्यबाण दिल्याबद्दल मोदी, शाह यांचे आभार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Shivsena Thackeray group,
उपमुख्यमंत्र्यांना सभेपूर्वी शिवसेना ठाकरे गटाकडून पनवेलकरांच्यावतीने पाच प्रश्न

quiziframe id=30 dheight=282px mheight=417px

हेही वाचा : “घरात काम करणाऱ्यांना वाय प्लस, झेड प्लस सुरक्षा”; उद्धव ठाकरेंचा पार्थ पवारांच्या सुरक्षेवरुन टोला

ते पुढे म्हणाले, “आता विरोधक काहीही आरोप करायला लागले आहेत. एका शेतकऱ्यांच्या मुलाला ते बोलले आहेत. मात्र, मी एवढेच ठरवले आहे की, तुम्ही आरोप करा. मी कामातून तुमच्या आरोपाला उत्तर देईल. देवेंद्र फडणवीस आणि आम्ही बरोबर काम करत होतो. त्यानंतर अजित पवार बरोबर आले आणि सरकार मजबूत झाले. ते म्हणत होते आज सरकार पडणार, उद्या सरकार पडणार पण सरकार पडले नाही आणि त्यांचा ज्योतिषी खोटा निघाला”, असा पलटवार मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंवर केला.

सरकार फेसबुकवर चालत नाही

“आम्ही दोन वर्षांपूर्वी उठाव केला आणि लोकांना न्याय देणारे सरकार स्थापन केले. घरात बसून सरकार चालवता येत नाही. अजित पवार सकाळी ६ वाजता उठतात. मी पहाटेपर्यंत काम करतो. पहाटे अजित पवार काम सुरु करतात आणि देवेंद्र फडणवीस दिवसभर काम करतात, म्हणजे २४ तास आपले सरकार चालते आहे. घरी बसून राज्य चालवता येत नाही. फेसबुक लाईव्ह वरुन राज्य चालवता येत नाही”, असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.