Raigad Khalapur Irshalgad Irshalwadi Landslide : रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुसळधार पावसामुळे इर्शाळगडावरील दरड इर्शाळवाडीवर कोसळली. दरडप्रवण क्षेत्राच्या बाहेर असलेल्या या भागात दरड कोसळल्याने गावातील लोक भयभीत झाले आहेत. आतापर्यंत १०३ लोकांना या भागातून बाहेर काढण्यात आलं आहे. यापैकी १२ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडी येथे जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे तिथून गाडी जाणे अशक्य आहे. ही घटना समोर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तत्काळ खालापूरला दाखल झाले. तेव्हापासून ते परिस्थितीचा आढावा घेत होते. अशा परिस्थितीत घटनास्थळी जाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पायी चालत निघाले. दीड तास पायी चालत जाऊन ते इर्शाळगडावर पोहोचले आहे. धुके, निसरडी वाट आणि पाऊस असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इर्शाळवाडीवर पायी चालत गेले. तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांनी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
different move in alliance has increased uneasiness in the Shinde Sena
मित्रपक्षाच्या ‘रसदी’मुळे शिंदे सेनेत अस्वस्थता
Solapur Murder wife, Solapur, Murder second wife,
सोलापूर : तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणांवरून दुसऱ्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर
Pramod Patil, Vaishali Darekar
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “इथे वाहन येऊ शकत नाहीय. सर्व मॅन्युअली करावं लागतंय. एसडीआरएफ, एनडीआरएफ, सामाजिक संस्थांकडून मदत केली जातेय. त्यांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या १०३ लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे. त्यात १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. बचाव कार्य आणि मदत कार्य सुरू आहे. काही लोक कामानिमित्त बाहेर गेले आहेत, त्यांचा शोध घेतला जातोय. काही मुलं आश्रमशाळेत आहेत, त्यांची माहिती घेतली जातेय. झालेली दुर्घटना दुर्दैवी आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा >> Irshalwadi Landslide: “इर्शाळवाडीची दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद!”, गावकऱ्यांचं आदित्य ठाकरेंकडून सांत्वन

“खरं म्हणजे अनेक नातेवाईकांना भेटलो, सरकार त्यांच्या पाठीशी उभं आहे. मृतांच्या नातेवाईकांना शासन ५ लाखांची मदत करणार आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. कठीण बचावकार्य असातनाही जवान स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत. मदत आणि बचाव कार्य अवघड आहे. पावसातही बचाव कार्य सुरू आहे”, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिली.

विरोधकांच्या आरोपावर आज बोलणार नाही

“हे राजकारण, आरोप-प्रत्यारोप करण्याची वेळ नाही. मी त्यावर बोलू इच्छित नाही. आता फक्त प्राधान्य दिलं आहे ते मदत आणि बचावकार्याला. जे लोक यात अडकले आहेत, त्यांना बाहेर सुरक्षित काढणं, जे बाहेर आलेत त्यांना सुरक्षितस्थळी ठेवणं, नियोजन करणं याकडे लक्षकेंद्रीत केलं आहे. त्यामुळे विरोधकांच्या आरोपावर आज बोलणार नाही”, असं शिंदे म्हणाले.

बचावकार्य पथकांचे आभार

एकीकडे पाऊस पडतोय, डोंगर खाली आलेला आहे. १०-१५ फूट माती आहे. अशा परिस्थितीत येथे मशिनरी येऊ शकत नाही. दोन हेलिकॉप्टर आम्ही तयार ठेवले होते. परंतु, खराब हवामानामुळे लोक हेलिकॉप्टर येथे येऊ शकत नाही. त्यामुळे वाट काढत काढत लोक खाली येत आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ, सामाजिक संस्थांचे यासाठी मनापासून आभार, असंही शिंदे म्हणाले.

हेही वाचा >> “माझा वाढदिवस साजरा करू नका”, इर्शाळवाडी दरड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची घोषणा!

“इर्शाळवाडी येथील दरड कोसळलेल्या दुर्घटना स्थळाच्या दिशेने चालत असताना वाटेत काही ग्रामस्थ मला भेटले. त्यांची आस्थेने विचारपूस करून प्रत्यक्ष परिस्थिती देखील जाणून घेतली. तसेच त्यांना धीर देत सरकार तुम्हाला शक्य ती सारी मदत करेल असे आश्वस्त केले. मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढणे, शक्य तेवढ्या नागरिकांचे जीव वाचविणे याला राज्य सरकारचे प्राधान्य आहे. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार आम्ही केला आहे, असं ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

दरम्यान, ‘दरडप्रवण क्षेत्रात हा भाग नव्हता. दरडी कोसळण्याच्या प्रवण भागात लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना लोकांना देण्यात आल्या आहेत”, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं. यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, स्थनिक आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार अनिकेत तटकरे तसेच रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे हेदेखील उपस्थित होते.