पालघर तालुक्यातील खडकोली या गावात चिकनगुनियाचा एक रुग्ण आढळून आला आहे. गावात तापाची साथ पसरल्याने नागरिक भयभीत झाले आहे. पाच नागरिकांना तापाची लागण आहे. त्यातील काहींना हा आजार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांचे अहवाल तपासणीसाठी डहाणू प्रयोगशाळेत पाठवले आहेत. ते आल्यानंतरच त्यांना चिकणगुनिया आहे किंवा नाही हे समजणार आहे.

खडकोली गावाची लोकसंख्या १०२३ असून २०७ घरे आहेत. गेल्या दोन-तीन दिवसापासून गावातील अनेकांना तापाची लागण झाली आहे. अनेकांना अंगदुखी सारख्या लक्षणांना सुरुवात झाली आहे. यातील रुग्णांपैकी एका रुग्णाच्या तपासणी अहवालात तो चिकनगुनियाने बाधित असल्याचे समजले. त्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.

घरात साठवलेल्या पाण्यामध्ये डास व डासांच्या अळ्या

संपूर्ण गाव साथ उद्रेक म्हणून घोषित करण्यात आला आहे. गावामध्ये नागरिकांच्या घरात साठवलेल्या पाण्यामध्ये डास व डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तापाची साथ पसरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. किटकजन्य आजार जाहीर केल्यामुळे या गावात सतर्कतेचा इशारा आरोग्य विभागामार्फत देण्यात आला आहे.

हेही वाचा : पालघर : केळवा समुद्र किनारी चौघांचा बुडून मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागरिकांच्या तपासण्या सुरू

या प्रकारानंतर आरोग्य विभागामार्फत दक्षता घेण्यात येत आहे. नागरिकांच्या तपासण्या केल्या जात आहेत. हा आजार पसरू नये यासाठी आरोग्य विभाग व पथकामार्फत दररोज पाहणी करून उपाय योजना करीत असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत खंदारे यांनी म्हटले आहे.