वाई:युनायटेड वेस्टर्न बँकचे संस्थापक कै. वा. ग. चिरमुले यांच्या स्मरणार्थ साताऱ्यातील अण्णासाहेब चिरमुले चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा चिरमुले पुरस्कार आज  पद्मभूषण डॉ. सायरस पूनावाला यांना आज त्यांच्या इच्छेनुसार एका साध्या आणि अनौपचारिक कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. फार्मास्युटिकल उद्योगात विशेषतः जैवतंत्रज्ञान आणि आरोग्यसेवा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल सन २०२१च्या चिरमुले पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.  या ट्रस्टतर्फे दरवर्षी तंत्रज्ञान, बैंकिंग, विमा, अर्थशास्त्र आणि सामाजिक कार्य या क्षेत्रात अमूल्य सेवा देणाऱ्या उत्कृष्ट व्यक्तींचा सन्मान केला जातो. सन्मानचिन्ह आणि रु. एक लाख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.  

हेही वाचा >>> राज्यातील शाळांतील शिक्षकांना आता ‘ड्रेसकोड’, कोणत्या कपड्यांना बंदी?

Bharat Ratna, Yashwantrao Chavan,
सातारा : यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, उदयनराजे करणार मोदींकडे शिफारस
मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान

डॉ. सायरस पूनावाला यांनी १९६६ मध्ये सीरम इन्स्टिट्‌यूट ऑफ इंडियाची स्थापना केली. डॉ. पूनावाला यांचा “गुणवत्तेशी कोणतीही तडजोड नाही” यावर ठाम विश्वास आणि “परवडणाऱ्या लसींसह सर्वांसाठी आरोग्य” यातील जाणीवपूर्वक बांधिलकी यामुळे आज सिरम इन्स्टिट्‌यूट भारतातील आघाडीची बायोटेक कंपनी व जगातील सर्वात मोठी लस उत्पादक (डोसानुसार) कंपनी म्हणून नावारूपास आली आहे. डॉ. पूनावाला यांनी कै. अण्णासाहेब चिरमुले यांच्या, सातारा सारख्या शहरात राहून केलेल्या कार्याबद्दल गौरवोद्दगार काढले व पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल सर्व ट्रस्टीचे आभार मानले. डॉ. सायरस पुनावाला यांनी चिरमुले पुरस्कार स्वीकारण्यास संमती दिल्याने पुरस्काराने नवीन उंची गाठली असल्याचे विश्वस्तांनी म्हंटले आहे .चिरमुले ट्रस्टने यापूर्वी तात्कालीन पंतप्रधान  मनमोहन सिंग, विजय भटकर, डॉ. अनिल काकोडकर, रतन टाटा, राहुल बजाज, डॉ.सी. रंगराजन, गुलजार आदि आदरणीय व्यक्तिना या पुरस्काराने गौरविले आहे.यावेळी ट्रस्टचे विश्वस्त दिलीप पाठक, डॉ.अनिल पाटील, डॉ.अच्युत गोडबोले, समीर जोशी, मानसी माचवे,मानसी पतकी उपस्थित होते.