मिरज शहरातील रस्त्यावरील भाजीविक्रेते, फेरीवाले यांचे अतिक्रमण दूर करण्यात यावे अन्यथा आयुक्त व उपायुक्त यांना दिवाणी कोठडीत का ठेवू नये असा निकाल न्यायालयाने दिला असल्याची माहिती व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विराज कोकणे यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत दिली. मिरज शहरातील अग्निशमन दल कार्यालय ते हिंदमाता चौक, हिंदमाता चौक ते दत्त मंदिर व विद्यामंदिर प्रशाला या रस्त्यावर भाजी विक्री करण्यास अथवा पथविक्रेत्यांना थांबण्यास प्रतिबंध करावा असा आदेश मिरज प्रथम वर्ग न्यायालयाने २०११ मध्ये दिला होता.

हेही वाचा >>> Ganesh Chaturthi 2023: सांगली संस्थानच्या चोर गणपतीचे आगमन

न्यायालयीन प्रक्रियेच्या दुरुपयोगासाठी जनहित याचिका नको; याचिकाकर्त्यांना ५० हजार रुपयांचा दंड
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
mining projects in sindhudurg
सिंधुदुर्गातील खनिज प्रकल्प कायमचे बंद व्हावेत; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पर्यावरणवाद्यांना अपेक्षा

तत्कालिन आयुक्त व उपायुक्तांनी उङ्ख न्यायालयात अतिक्रमण दूर केल्याचे सांगितले होते. मात्र, व्यापारी असोसिएशनच्यावतीने या परिसरातील भाजी विक्रेते व पथविक्रेते यांची चित्रफित सादर करून महापालिकेच्यावतीने करण्यात आलेला दावा दिशाभूल करणारा असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर न्यायालयाने आयुक्त व उपायुक्त यांना अतिक्रमण हटविण्यास 13 ऑयटोंबरपर्यंतची मुदत दिली असून अतिक्रमण मुयत करून हा रस्ता सर्वसामान्य नागरिकांच्या वापरासाठी खुला करावा, अन्यथा आपणास दिवाणी कोठडीत का ठेवू नये याचा खुलासा करावा असे निर्देश दिले असल्याचे कोकणे यांनी सांगितले. याप्रकरणी व्यापारी रमेश कोपार्डे, मेघाराम, सुहास मजती, नूरउल भोकरे आणि प्रकाश शहा यांच्यावतीने न्यायालयात धाव घेतली आहे.