नांदेड : इयत्ता दहावीच्या परीक्षेला शुक्रवार (दि.२१) पासून प्रारंभ झाला आहे. पहिल्याच दिवशी मराठी विषयाच्या परीक्षेला तब्बल ५७८ विद्यार्थ्यांनी दांडी मारली. जिल्ह्यात १७२ केंद्रावर कडेकोट बंदोबस्तात ही परीक्षा घेतली जात आहे.नांदेड जिल्ह्यात यंदा जिल्हाधिकारी यांच्या पुढाकाराने कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा सुरु आहेत. बारावीच्या परीक्षा सुरळीत सुरु असताना शुक्रवारपासून दहावीच्या परीक्षेला प्रारंभ झाला. ४७ हजार ९३४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५७८ विद्यार्थी मराठी विषयाच्या पहिल्याच पेपरला अनुपस्थित राहिले. जिल्ह्यात एकूण १७२ परीक्षा केंद्रे असून, या सर्वच केंद्रांवर बैठ पथक नेमण्यात आले आहेत. शिवाय नऊ वेगवेगळे भरारी पथकांकडूनही परीक्षेवर करडी नजर ठेवली जात आहे.

आज काही केंद्रांवर परीक्षार्थ्यांचे फुल देवून स्वागत करण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत व्यस्त असले तरी, जिल्हाधिकाऱ्यांना या कामाच्या व्यस्ततेतून दहावीच्या परीक्षेची माहिती घेतली. शिक्षणाधिकारी माधव सलगर, प्राथमिक विभागाच्या डा. सविता बिरगे यांच्यासह शिक्षण विभागाचे वेगवेगळ्या पथकांनी केंद्रांना भेटी दिल्या. कोणत्याही परिस्थितीत कापी होणार नाही, याची दक्षता घ्या. अन्यथा कडक कारवाई करू, असा इशारा देण्यात आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संवेदनशील केंद्रांवर करडी नजर

जिल्ह्यामध्ये ३२ संवेदनशील परीक्षा केंद्रे असून, तेथे बैठे पथकासह अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तणावमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी, यासाठी तीन समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.