मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. “मला धमक्यांचे अनेकदा फोन आलेले आहेत. या धमक्यांचा माझ्यावर परिणाम होत नाही. मी जनतेतला माणुस आहे. मला जनतेमध्ये जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही”, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. धमकीचे मला काही अप्रूप नाही. कोणाला वाटलं तरी ते काहीही करू शकत नाहीत. त्यांनी अशाप्रकारचं धाडस करण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

“१९९२ च्या मुंबई दंगलीत तुम्ही होता, म्हणून…” शिंदे गटाचं बाळासाहेब ठाकरेंना भावनिक पत्र

या धमकीबाबत पोलीस आणि गृह विभागाकडून योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे. नक्षलवाद्यांकडून याआधीही धमक्यांचे फोन आले होते, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. दसरा मेळावा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना मुख्यमंत्र्यांना मिळालेली धमकी पोलीस यंत्रणेसमोर मोठं आव्हान आहे. शिंदे गटाचा दसरा मेळावा मुंबईतील बीकेसी मैदानावर तर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे.

आदित्य ठाकरेंना मोठा धक्का! वरळीतील शेकडो शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश, बालेकिल्ल्यातच कार्यकर्त्यांनी साथ सोडली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्फोट घडवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याचा कट असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. यानुसार पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. या धमकीनंतर शिंदेंच्या ठाण्यातील आणि शासकीय निवासस्थान ‘वर्षा’वरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या कार्यालयात महिनाभराआधी धमकीचे पत्र आले होते. त्यानंतर धमकीचा फोनदेखील आला होता. पंढरपुरातील आषाढी वारीच्या वेळीही मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर आत्ता पुन्हा मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.