मुंबईतील शिवसैनिकांसह विविध पक्षातील हजारो कार्यकर्त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान ‘वर्षा’वर शिंदे गटात प्रवेश केला आहे. वरळीतील शेकडो शिवसैनिकांचाही यात समावेश आहे. या पक्षप्रवेशावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी एक सामान्य नागरिक आहे. सर्वसामान्यांचे सरकार स्थापन झाल्याची लोकांची भावना आहे. त्यांना वाटतंय की हे सरकार आम्हाला न्याय देईल” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले आहे. “जे सोबत येतील त्यांना घेऊन पुढे जाऊया” असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरेंना मोठा धक्का! वरळीतील शेकडो शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश, बालेकिल्ल्यातच कार्यकर्त्यांनी साथ सोडली

मुंबईतील कोस्टल रोडबाबत कोळी बांधवाची नाराजी आहे. याबाबत संबंधित अधिकऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. वरळीतील शेकडो शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. वरळी विधानसभा मतदारसंघाचे आदित्य ठाकरे आमदार आहेत. याच मतदारसंघातून शिवसैनिकांनी आदित्य ठाकरेंची साथ सोडली आहे.

“१९९२ च्या मुंबई दंगलीत तुम्ही होता, म्हणून…” शिंदे गटाचं बाळासाहेब ठाकरेंना भावनिक पत्र

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी आज शिक्षक संघटनेच्या सदस्यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. या भेटीत शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी दिले आहेत. “शिक्षक तरुण पीढीला घडवण्याचे काम करतात. आई-वडिलांनंतर शिक्षकाचे स्थान महत्त्वाचे असते. म्हणून त्यांच्यासाठी दिवाळी बोनसचा निर्णय घेण्यात आला आहे”, असे मुख्यमंत्र्यांनी शिक्षकांशी संवाद साधताना म्हटले आहे.