काही लोकांना लॉकडाऊन आवडतो. चीनमध्ये लॉकडाऊन झाला की लगेच लॉकडाऊन घोषित करायचे. त्यामुळे दोन वर्ष कुठलेही सण सोहळे साजरे झाले नाहीत. आता आम्ही सर्व सण कसे दणक्यात साजरे करतो, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला. मीरा रोड येथे लता मंगेशकर नाट्यगृहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

हेही वाचा- Shinde vs Thackeray: ‘धगधगती मशाल’ पक्षचिन्ह दिल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “मशालीचे धोके…”

मीरा भाईंदर महापालिकेच्या विविध विकास कामाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामध्ये लता मंगेशकर नाट्यगृह, महाराणा प्रताप आणि चिमाजी अप्पा स्मारकांचे उद्घाटन आदी कार्यक्रमांचा समावेश होता. आम्ही बाळासाहेबांचे खरे वारसदार आहोत. म्हणून आम्हाला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आरपारची पहिली लढाई आम्ही जिंकली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. आम्हाला सत्तेचा मोह नव्हता. त्यामुळे मंत्री असतानाही सत्ता सोडली असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा- विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री शहरामध्ये आले होते. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यक्रमस्थळी पेन नेण्यासही बंदी घालण्यात आली होती.