मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माणुसकीचं दर्शन महाराष्ट्राला पुन्हा एकदा झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता एका नऊ वर्षांच्या चिमुकल्याची जबाबदारी घेतली आहे. नऊ वर्षांच्या या चिमुकल्याचं नाव गणेश आहे. तो पायांच्या बोटांनी लिहितो कारण त्याला जन्मतः दोन्ही हात नाहीत. पण त्याचं स्वप्न आहे सैनात जाण्याचं ते पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे. लवकरच गणेश या नऊ वर्षांच्या चिमुकल्याला कृत्रिम हात बसवण्यात येणार आहेत.

गणेश माळी हा चिमुकला शहादा तालुक्यातील असलोद गावातला

नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील असलोद गावात राहणारा गणेश माळी, वय अवघं नऊ वर्ष असलेला गणेश इयत्ता ३ री मध्ये शिकतो आहे. जन्मापासूनच दोन्ही हात नसलेल्या गणेशच्या कोवळ्या वयातही त्याचं शिक्षण आणि खेळातील अभिरुचीला त्याचा अपंगत्व थांबू शकले नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या समोर गणेशने पायाने आपलं पूर्ण नाव लिहून दाखवलं.

मुख्यमंत्र्यांची आणि गणेशची भेट कशी झाली?

काही दिवसांपूर्वी गणेशला अपंगत्व आहे त्याला मदत करा असे आर्जव करत त्याचे वडील त्याला मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्याकडे घेऊन आले होते. परंतु सदर आजार मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये बसत नसल्याने मंगेश चिवटे यांनी राज्याचे संवेनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घालून दिली. साहेबांनी लगेचच गणेशची संपूर्ण जबाबदारी घेतली पहिल्या टप्प्यामध्ये ५ लक्ष रूपयाचा धनादेश त्यांच्या वडिलांकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच लवकरच त्याला कृत्रिम हात बसवून देण्याचे आश्वासन दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सैन्यात जाण्याचं गणेशचं स्वप्न, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबदारी

यावेळी गणेशला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी “मोठं झाल्यावर तुला काय व्हायचं आहे?” असा प्रश्न विचारला असता गणेशने “मला मोठं झाल्यावर आर्मीमध्ये भरती व्हायचं आहे आणि शत्रूवर गोळ्या झाडायच्या आहेत” असं उत्तर गणेशने दिले. यावेळी संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी गणेशचं आर्मीमध्ये भरती होण्याचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत त्याच्या पाठीशी उभे राहणार असल्याचा शब्द दिला.