शेतकरी आत्महत्या ते मेट्रो प्रकल्प, नवं सरकार अडीच वर्षे कशावर काम करणार? मुख्यमंत्री शिंदेंनी सविस्तर सांगितलं, म्हणाले…

आज राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनाची सांगता झाली. हे अधिवेशन अनेक अर्थांनी खास ठरले.

शेतकरी आत्महत्या ते मेट्रो प्रकल्प, नवं सरकार अडीच वर्षे कशावर काम करणार? मुख्यमंत्री शिंदेंनी सविस्तर सांगितलं, म्हणाले…
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (फोटो- देवेंद्र फडणवीस यांचे यूट्यूब चॅनेल)

आज राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनाची सांगता झाली. हे अधिवेशन अनेक अर्थांनी खास ठरले. शिंदे गट-भाजपा सरकारने अधिवेशनात आज विश्वासदर्शक ठराव हुमताने जिंकला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे सरकार राज्याच्या सर्वांगीन विकासासाठी काम करेन, अशी ग्वाही दिली. तसेच लवकरच इंधनावरील व्हॅट कमी करण्यात येईल. आगामी काळात सरकार महाराष्ट्र शेतकरी आत्महत्या मुक्त करण्यासाठी प्रयत्न करेन, अशी माहिती त्यांनी दिली. अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा >>> “५० आमदारांपैकी प्रत्येकाकडे स्वतःचे १-२ हजार दबंग कार्यकर्ते, आम्ही ते शस्त्र…”; ‘गद्दार’ म्हणणाऱ्यांना मुख्यमंत्री शिंदेंचा सूचक इशारा

“काल आम्ही विधानसभा अध्यक्षांची निवडणूक जिंकली. आज सरकारवरील विश्वासदर्शक ठरावही १६४ विरुद्ध ९९ अशा मतांच्या फरकाने जिंकला आहे. चर्चा करुन अधिवेशनाची पुढची तारीख ठरवली जाईल. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचं तसेच भाजपा-शिवसेनेच्या युतीचं सरकार स्थापन झालं आहे,” असे शिंदे म्हणाले.

हेही वाचा >>> बंडखोर आमदारांना परत बोलवणारे संतोष बांगर शिंदे गटात कसे आले? खुद्द एकनाथ शिंदेंनीच सांगितली इनसाईड स्टोरी, म्हणाले…

तसेच, “या सरकारला देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे वाटचाल केली आहे. त्यामुळेच फडणवीस यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. हे लोकांच्या मनातील सरकार आहे. लोकांना अपेक्षित असलेलं हे सरकार आहे,” असेही शिंदे म्हणाले.

हेही वाचा >>> एकनाथ शिंदेंच्या भाषणावर अजित पवार सभागृहातच बोलले; म्हणाले “ज्यांच्यासाठी कष्ट घेतो, त्यांनीच मन दुखावलं की…”

“मतदारसंघातील विकासांना प्राधान्य देण्यासाठी निवडून यायचं असतं. देवेंद्र फडणवीस यांनी चोवीस तास काम केलं आहे. जी कामं रखडलेली आहेत, ते पूर्णत्वास घेऊन जाण्याचं काम फडणवीस यांच्या काळात झालं. मेट्रोच्या माध्यमातून आरामदायी प्रवास होणार आहे. हे काम काही कारणास्तव रखडले होते. हे काम पुढे घेऊन जाण्याचा फडणवीस आणि मी प्रयत्न करणार आहोत,” असे शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> ‘१०० शिवसैनिक भुजबळांमुळे जेलमध्ये गेले, मार मार मारलं..,’ एकनाथ शिंदेंनी सांगितला सीमाभागातील आंदोलनाचा ‘तो’ खास घटनाक्रम

“या राज्यातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. जलसंपदा तसेच जलसंधराण विभागाची काही कामे अडलेली आहेत. ती पूर्णत्वास नेण्याचं काम आम्ही करणार आहोत, ज्यामुळे सिंचनाखाली मोठी जमीन येईल. राज्य शेतकरी आत्महत्यामुक्त कसा होईल? यासाठी आमचा प्रयत्न असेल,” अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.

हेही वाचा >>> ‘माझं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न, शेवटी हा..,’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खळबळजनक आरोप

“या राज्याचा सर्वांगीन विकासासाठी तसेच प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी सहकाऱ्यांना तसेच विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन आम्ही काम करणार आहोत. जेवढं आम्हाला शक्य होईल तेवढं जास्त देण्याचा आम्ही प्रयत्न करु. हिरकणी गावाच्या विकासाचा जो प्रश्न आहे, त्यासाठी आम्ही २१ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. तसेच इंधनावरील व्हॅट कमी करण्याचाही आम्ही लवकरच निर्णय घेऊ. सर्व प्रकल्प लकवरात लकवर कसे पूर्ण होतील त्यासाठी आमचा प्रयत्न असेल,” अशी माहिती शिंदे यांनी दिली.

तसेच, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेले आहे, की केंद्र सरकार तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. तसेच विकासासाठी कुठेही आवश्यकता असेल, तर आम्ही पाठिंबा देऊ; असे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं आहे. जेव्हा राज्य आणि केंद्र एकत्र येतं, तेव्हा विकास जलदगतीने होतो. देवेंद्र फडणवीस यांचा जो अनुभव आहे, त्याचा फायदा राज्याला होणारच आहे,” असे म्हणत शिंदे यांनी केंद्र सरकार तसेच भाजपा पक्षाची स्तुती केली.

हेही वाचा >>> अधिवेशनात गुलाबराव पाटलांचे आक्रमक भाषण, म्हणाले ‘आम्ही बंड नाही तर…’

“महाविकास आघाडीमध्ये सगळेच घुसमटत होते. प्रतोद हे भरत गोगावले आहेत आणि मी गटनेता आहे. त्यामुळे व्हीपचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार. आम्हीच खरी शिवसेना आहोत. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असतं. या देशात नियम आहेत. कायदे आहेत. संविधानाविरोधात कोणाला जाता येणार नाही. न्यायालयाने त्यांना फटकारले आहे. कोर्ट त्यांना उभे करणार नाही. हे सरकार अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेन. येणाऱ्या निवडणुकीत आमचे २०० आमदार निवडून येतील,” असेही शिंदे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cm eknath shinde said new maharashtra government will work on farmers suicide metro project and development prd

Next Story
बंदुकीच्या धाकावर दरोडेखोरांनी दागिने लुटले; घरमालकाला शौचालयात कोंडून दरोडेखोर पसार
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी