काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएमचाही जोरदार प्रचार; लातूरमध्ये चार नगरपालिकांसाठी बुधवारी मतदान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहिल्या टप्प्यातील विजयानंतर लातूर जिल्ह्य़ातील चारही नगरपालिकांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभा पार पडल्याने भाजपचा आत्मविश्वास बळावला आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपापल्या ताब्यातील पालिकांमध्ये सत्ता कायम राखण्याकरिता जोर लावला आहे.

बुधवारी निवडणूक होत असलेल्या चारपैकी निलंगा व उदगीर या पालिकेत काँग्रेस तर अहमदपूर व औशात राष्ट्रवादी काँग्रेसची सध्या सत्ता आहे. भाजपचे स्थान सर्वच पालिकांमध्ये नगण्य आहे. पहिल्या टप्प्यात सर्वाधिक नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आल्याने भाजपच्या आशा साहजिकच पल्लवीत झाल्या आहेत. मात्र मराठवाडय़ात पक्षाला फटका बसल्याने पालकमंत्री संभाजी निलंगेकर-पाटील हे सावध झाले आहेत. नगरपालिका निवडणुकीत जे यश मिळेल त्याचा लाभ पुढील कारकीर्दीसाठी उठवता येईल हे लक्षात घेऊन त्यांनी व्यूहरचना आखली. भाजपची हवा तयार करण्याकरिता मुख्यमंत्र्यांचा दौरा झाला.

औसा, निलंगा, उदगीर व अहमदपूर या चारही पालिकेच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रविवारी सभा पार पडल्या. कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात अधिक धावा केल्यानंतर कप्तानाची जी मन:स्थिती असते तशी मन:स्थिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असल्याचे त्यांच्या प्रचारसभांतील भाषणांवरून दिसून आले. काँग्रेस व राष्ट्रवादी यांचे नावही न घेता गेल्या दोन वर्षांत राज्य सरकार कशी कामगिरी करते आहे याची माहिती दिली. राज्यातील तीनशे शहरांपकी १०० शहरे हागणदारीमुक्त केली असून पुढील वर्षांत उर्वरीत २०० शहरे हागणदारीमुक्त होतील. स्वच्छता, सांडपाणी व्यवस्था, कचरा हे प्रश्न शहरी भागातील मार्गी लागतील व इंदिरा आवास योजनेप्रमाणे लाभार्थ्यांचे तोंड पाहून गरिबांना घरे दिली जाणार नाहीत तर ‘सबका साथ सबका विकास’ या पद्धतीने पंतप्रधान आवास योजना राबवली जाईल. २०२२ पर्यंत केंद्र सरकारने उद्दिष्टपूर्तीची मुदत ठेवली असताना महाराष्ट्र सरकार २०१९ पर्यंत हे काम करेल. केंद्र व राज्यात भाजपचे सरकार असल्यामुळे आपल्या गावापर्यंत विकासाच्या योजना योग्य पद्धतीने राबवण्यासाठी भाजपला सत्ता द्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

[jwplayer 5gvq5jpZ]

विरोधकांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या प्रमुख विरोधी पक्षांनी प्रचाराच्या निमित्ताने सरकारला लक्ष्य केले. राष्ट्रवादीचे  माजी अर्थमंत्री जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रवक्ते नवाब मलिक यांच्या सभा झाल्या. नोटाबंदी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे मुद्दे प्रचारात मांडण्यात आले. परळीपेक्षा विकासासाठी अधिक पसा मिळवून देईन, असे आश्वासन धनंजय मुंडे यांनी दिले. आपल्या कारकीर्दीत कोणत्या शहराचा विकास केला याबद्दल मात्र राष्ट्रवादीच्या मंडळींना बोलता आले नाही.

काँग्रेस पक्षातर्फे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या औसा, निलंगा व अहमदपूर या तीन पालिकेत सभा झाल्या. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांना दैवत मानणाऱ्या आमदार बसवराज पाटील यांनी औशातमध्ये त्यांची सभा आयोजित केली होती, मात्र उर्वरीत नगरपालिकेत चाकूरकरांच्या नेतृत्वाचा लाभ घेण्यास काँग्रेसने असमर्थताच व्यक्त केली. उदगीर पालिकेच्या उमेदवारांचा अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी आमदार अमित देशमुख यांची शुभारंभाची प्रचारसभा झाली त्यानंतर काँग्रेसच्या प्रचाराची एकही सभा उदगीरमध्ये झाली नाही. आम्हाला कोणाच्या सभांची गरज नाही, आम्ही आमच्या ताकदीवर पुन्हा निवडून येऊ, हा विश्वास आठ वेळा नगराध्यक्ष राहिलेले राजेश्वर निटुरे व त्यांना साथ देणाऱ्या माजी आमदार चंद्रशेखर भोसले यांना आहे.

एमआयएमने आपली शक्ती पणाला लावली आहे. उदगीर पालिकेच्या प्रचारासाठी पहिल्या टप्प्यात आमदार अकबर ओवेसी व आमदार इम्तियाज जलील यांच्या सभा झाल्या. या चारही ठिकाणी एमआयएमने आपले उमेदवार उभे केले असून मुस्लीम मतावर कब्जा मिळवण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादीने चारही ठिकाणी नगराध्यक्षपदाकरिता मुस्लीम उमेदवार उभे काँग्रेसच्या पायात खोडा घालण्याची खेळी केली आहे. शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचे ठरवले. संपर्कप्रमुख संजय सावंत, शिवरत्न शेटे, नितीन बाणगुडे पाटील यांच्या प्रचारसभा झाल्या. शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवल्यामुळे आपली खरी ताकद कळेल या जिद्दीने शिवसेना िरगणात आहे. जिल्हय़ात १०१ नगरसेवकांपकी शिवसेनेचे चार तर भाजपचे १० नगरसेवक पूर्वी होते.

नोटाबंदीवरून धडा शिकवा

राज्यातील महिला असुरक्षित आहेत. दीनदलित, शेतकरी, शेतमजूर व सामान्यांचे प्रश्न सरकारला समजत नाहीत. भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढाई लढत असल्याचा आव आणला जात असला तरी सामान्य माणसांचे स्वत:चे पसे बँकेतून काढण्यासाठी मृत्यू होत आहेत. लोकांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. सामान्यांच्या प्रश्नाशी या सरकारची अद्याप नाळच जुळलेली नसल्यामुळे या सरकारला पालिका निवडणुकीच्या माध्यमातून गतिरोधक लावा, असे आवाहन राष्ट्रवादी व काँग्रेसच्या प्रचारसभांतून करण्यात आले.

[jwplayer xuPLUdGh]

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm fadnavis tour to latur
First published on: 13-12-2016 at 01:46 IST