काँग्रेसचे नेते भुरटे चोर होते, तर भाजपचे नेते डाकू आहेत. आम्हाला भाजपची टीम म्हणणारे हेच काँग्रेस शेवटच्या क्षणापर्यंत आमच्याशी युतीची वाट बघत होते, तर दुसरीकडे मुख्यमंत्री घाबरलेले आहेत, त्यांनी वंचित आघाडी विरोधी पक्ष असेल असे भाकीत केले आहे. मात्र, यावेळी आम्ही सत्तेत बसू आणि भाजप विरोधी पक्ष म्हणून काम करेल, असा घणाघात टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते व भारिप बहुजन महासंघाचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंबेडकर हे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून उभे असलेले वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार राजू झोडे यांच्या प्रचारार्थ बल्लारपुरात आयोजित सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी जनतेकडून निवडणुकीसाठी आर्थिक मदतीचे, उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते व त्यांनी दानपेटीत आर्थिक मदतही केली. यावेळी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील वंचितचे उमेदवार अनिरुद्ध वनकर, राजुरा क्षेत्राचे गोदरू पाटील जुमनाके, राजू झोडे आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader thief bjp robber says prakash ambedkar abn
First published on: 12-10-2019 at 00:43 IST