मुंबई  : मुख्यमंत्री व गृहमंत्री आपल्यावर पाळत ठेवत असल्याचे विधान करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पक्षाकडून कानउघाडणी झाल्यावर त्यांनी आपली भूमिका बदलली. मात्र त्यांच्या सततच्या बेताल वक्तव्यांनी काँग्रेस नेते मात्र अस्वस्थ झाले आहेत.

आगामी निवडणुकीत स्वबळाचा नारा पटोले यांनी दिल्याने शिवसेना व राष्ट्रवादीत प्रतिक्रि या उमटली होती. यापाठोपाठ राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसला किं वा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आपल्या हालचालींवर पाळत ठेवत असल्याचे वक्तव्य पटोले यांनी लोणावळ्यात झालेल्या पक्षाच्या बैठकीत के ले. काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीत सहभागी असताना स्वपक्षाच्या सरकारवर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप के ल्याने त्याची साहजिकच प्रतिक्रि या उमटली. भाजपला तर आयतीच संधी मिळाली. पटोले यांच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी के ली.  ‘ नाना पटोले यांच्यासारख्या लहान माणसाच्या वक्तव्यावर मी काय प्रतिक्रि या व्यक्त करणार, असा  सवाल करीत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पटोले यांना अजिबात किं मत देत नाही हेच सूचित केले.

काँग्रेसचे राज्याचे प्रभारी एच. के . पाटील हे सोमवारपासून राज्याच्या दौऱ्यावर आहेत.

माहिती घ्या, राष्ट्रवादीचा सल्ला 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजकीय घडमोडींची पोलीस माहिती घेतात, ती मुख्यमंत्र्यांना दिली जाते, याबद्दल पटोले यांना कल्पना नसल्यास त्यांनी त्यांच्याच पक्षाचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकु मार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे माहिती घ्यावी, असा उपरोधीक सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते  तथा राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिला. लोणावळा येथील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना नाना पटोले यांनी आपल्यावर पोलीस पाळत ठेवत आहेत व त्याची माहिती मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रयांना दिली जात असल्याचे वक्तव्य के ले. त्यावरुन नव्या वादाला तोंड फु टले आहे. या संदर्भात सोमवारी माध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी पटोले यांच्या या विधानाचा समाचार घेतला.