राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली त्याला जेमतेम सात दिवस झालेले असताना शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी गौप्यस्फोट केला आहे. काँग्रेसचे आमदारही फुटणार आहेत असं आता गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. शरद पवार विरुद्ध अजित पवार असं चित्र राज्यात निर्माण झालं आहे. अशात शरद पवार यांनी महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. अजित पवार यांनीही उत्तरसभा घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. अशात आता गुलाबराव पाटील यांनी काँग्रेस फुटणार असल्याचंही म्हटलं आहे.
हे पण वाचा मोदींची जादू ओसरल्याने फोडाफोडी!, राष्ट्रवादीतील बंडाबाबत पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?
“नीलम गोऱ्हेही आमच्याकडे आल्या. त्यांना प्रवेश करण्याची खरंतर गरज नव्हती. पण दाल में कुछ काला है त्यामुळेच त्या आमच्या बरोबर आल्या. त्यामुळेच लोक पक्षांतर करत आहेत. जे काही सुरु आहे ते तुम्ही बघत आहात. उद्या काय होईल ते काही सांगता येत नाही. मी तर ऐकलं आहे की काँग्रेसचे आमदारही तयारीत आहेत. सांगता येत नाही. ते कुणाकडे येतील ते माहित नाही. पण ते येतील अशी चर्चा आहे.” असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी गौप्यस्फोट केला आहे.
हे पण वाचा- तुम्ही परत या मी निघून जाईन, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे अजित पवार गटाला आवाहन
अजित पवार येणार ही कल्पना होती का?
“गेल्यावेळी मी नगर येथील सभेत सांगितलं होत की, विखे पाटील आणि त्यांचा मुलगा भाजपकडून निवडणूक लढेल. त्याप्रमाणे ते भाजपकडून निवडणूक लढले. त्यांनतर मी दोन महिन्यापासून सांगत होतो की, अजित पवार आपल्याकडे येतील ते आले, असे पाटील म्हणाले. आता काँग्रेसवाले येतील ते पण बघा”, असा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. याबाबत काँगेस आमदारांची काही चर्चा झाली आहे का? असं विचारलं असता, काहीच चर्चा झाली नसल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले..