पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजपचे सरकार येऊन दोन वष्रे पूर्ण झाली तरी निवडणुकीच्या काळात जनतेला दिलेली आश्वासने हे सरकार पूर्ण करू शकलेले नाही. त्याचा निषेध अलिबाग तालुका काँग्रेस कमिटीतर्फे करण्यात आला. अलिबाग तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अनंत गोंधळी, तालुका सरचिटणीस योगेश मगर, जिल्हा उपाध्यक्ष म. हि. पाटील, प्रदेश कार्याकारिणी सदस्य हर्षल पाटील, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा अॅड. श्रद्धा ठाकूर, अलिबाग-मुरुड विधनासभा मतदारसंघ युवक काँग्रेस अध्यक्ष अॅड. प्रथमेश पाटील, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष सुनील थळे, अलिबाग तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा मीनाक्षी खारसंबळे, सरोज डाकी, वैभव पाटील, गजानन तिके, अशा वारंगे, अजित माळी, भास्कर चव्हाण, जगन्नाथ पाटील, रमेश म्हात्रे, प्रभाकर राणे, ज. गो. पाटील आदी या वेळी उपस्थित होते. ए. आर. अंतुले भवन येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची सभा घेण्यात आली. त्यानंतर तहसील कार्यालयात जाऊन अलिबागचे नायब तहसीलदार अनिल गोसावी यांना निवेदन सादर करण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jun 2016 रोजी प्रकाशित
अलिबाग तालुका काँग्रेसतर्फे सरकारचा निषेध
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजपचे सरकार येऊन दोन वष्रे पूर्ण झाली
Written by लोकसत्ता टीम

First published on: 03-06-2016 at 01:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress party not happy with bjp