सोलापूर : ‘भगवा दहशतवाद’ असे संबोधण्याऐवजी ‘सनातन दहशतवाद’ असे म्हणा असे विधान करणारे काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिमेची प्रतीकात्मक गाढवावर बसवून ‘धिंड’ काढण्यात आली. हे आंदोलन शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या युवा सेनेतर्फे करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेल्या या गाढवावरून पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिमेची प्रतीकात्मक ‘धिंड’ रूपी आंदोलनाचे नेतृत्व युवा सेनेने अध्यक्ष सागर शितोळे यांनी केले. या आंदोलनात सुजित खुर्द व प्रियदर्शन साठे आदींसह सुमारे दहा शिवसैनिक सहभागी झाले होते.

या आंदोलनात गाढव आणण्यात आले होते. त्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिमेला प्रतीकात्मक बसवून त्यांची ‘धिंड’ काढण्यात आली होती. यावेळी बोलताना सागर शितोळे यांनी, धर्माच्या नावावर दहशतवाद चिकटवण्याचा प्रयत्न केल्यास आम्हीही असे नक्कीच दहशतवादी होऊ, असा इशारा दिला. यावेळी सुजित खुर्द यांनीही मनोगत मांडताना पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाचा समाचार घेतला. माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी यापूर्वी सर्वप्रथम हिंदू दहशतवादी म्हणून उल्लेख केला होता. त्याची शिक्षा त्यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून सलग दोनवेळा पराभव पत्करावा लागला होता. विद्यमान खासदार प्रणिती शिंदे यांनी पित्याला साजेसेच वक्तव्य करून भारतील लष्कराने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख तमाशा असा केला होता. त्यांनाही त्याची शिक्षा सोलापूरकर दिल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा दिला.

छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेल्या या गाढवावरून पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिमेची प्रतीकात्मक ‘धिंड’ रूपी आंदोलनाचे नेतृत्व युवा सेनेने अध्यक्ष सागर शितोळे यांनी केले. या आंदोलनात सुजित खुर्द व प्रियदर्शन साठे आदींसह सुमारे दहा शिवसैनिक सहभागी झाले होते.यापूर्वी खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांनी निषेधार्थ गाढव आणून त्याची तुलना खासदार प्रणिती शिंदे यांच्याशी केली होती. त्यास प्रत्युत्तरादाखल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपचे आंदोलन जावई आणि सासूबाई यांचेच होते. त्यात अन्य कोणीही आमदार वा पक्षाच्या शहराध्यक्ष यांचा सहभाग नव्हता. केवळ वरिष्ठांना खुश करण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी हे आंदोलन केले होते. कोठे यांचे घराणे कोणामुळे मोठे झाले ? त्यांचे आजोबा विष्णुपंत कोठे हे सुशीलकुमार शिंदे यांचे वर्षानुवर्षे संपर्क प्रमुख म्हणून काम केले होते, अशी आठवण काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी करून दिली.