करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभमीवर देशातील सर्व रुग्णालये, करोना समर्पित रुग्णालये, आरोग्य सुविधा यांच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी २७ डिसेंबर रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्याचे आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले होते.

चीन, जपान, अमेरिका, दक्षिण कोरिया, ब्राझिल आणि फ्रान्स आदी देशांमध्ये करोनो रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्याने केंद्र सरकारकडून देशातील आरोग्य सुविधांचा आढावा घेतला जात आहे.

नक्की पाहा – PHOTOS : करोनाबाधितांच्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या सज्जतेच्या आढाव्यासाठी विशेष मोहीम

या पार्श्वभूमीवर राज्यात मॉक ड्रीलच्या माध्यमातून रुग्णालयाची तयारी किती, तिथे व्हेंटिलेटर किती, सुरू किती, इतर संसाधने किती प्रमाणात आहेत. याची माहिती घेण्यात आली. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पत्रकारपरिषदेतून याबाबत माहिती दिली. याप्रसंगी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंडारे यांचीही उपस्थिती होती.

काल संध्याकाळी ५ वाजेपर्यंत राज्यातील १हजार ३०८ रुग्णालयाची मॉक ड्रील पूर्ण झाली. तर ही मोहीम रात्रीपर्यंत सुरू होती. आपत्ती व्यवस्थापनचा भाग म्हणून ही मॉक ड्रील सुरू आहे. यात ऑक्सिजन, ऑक्सिमीटर, चालू किती बंद किती, या संसदर्भात सगळी माहिती घेतली जात आहे.

आणखी वाचा – Covid New Variant: करोनाविरुद्धच्या लढ्यात घरामधील ‘हे’ पदार्थ ठरतील सुरक्षाकवच! आजच करा आहारात समावेश

केंद्र सरकारने घाबरू नका काळजी घ्या हे धोरण घेतलं आहे, याच अनुषंगानं आरोग्य विभाग काम करत आहे. नवीन वर्ष, यात्रोत्सव हे गर्दीचे दिवस असल्याने काळजी घेण्याच आवाहन करण्यात येत आहे.

हेही वाचा – विश्लेषण: करोनाचा पुन्हा प्रसार होणार? सामना करण्यासाठी ‘हर्ड इम्युनिटी’ आणि ‘हायब्रिड इम्युनिटी’ ठरणार उपयोगी; यातला नेमका फरक काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ओमायक्रोनचा नवा विषाण जगभरात मोठ्या प्रमाणात पसरत आहे. त्यामुळे करोनाचा सामना करण्यासाठी देशातील सर्व रुग्णालयांमधील आरोग्य सुविधा सज्ज आहे का याची खातरजमा करण्यासाठी ही आढावा मोहीम सुरू आहे. अद्याप आपल्याकडे लाट आलेली नाही पण काळजी घेतली जात आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत.