राज्यात आज दिवसभरात १ हजार ५२० रूग्ण करोनामधून बरे झाले असून, १ हजार ४१० नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याचबरोबर १८ करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंद देखील झाली आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण ६४,३५,४३९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.४६ टक्के एवढे झाले आहे.
आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,०२,९६१ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १४००१६ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,१८,९३,६९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,०२,९६१ (१०.६७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,९१,४०१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण २३,८९४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.