राज्यात आज दिवसभरात १ हजार ५५५ रूग्ण करोनामधून बरे झाले असून, ७५१ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याचबरोबर १५ करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६४,६०,६६३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९७.६२ टक्के एवढे झाले आहे.

आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,१८,३४७ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १४०४०३ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,३३,०२,४८९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,१८,३४७ (१०.४६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,३८,१७९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ८६५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १३,६४९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.