मुंबई : राज्यात करोनाची तिसरी लाट ओसरत आली असून दैनंदिन रुग्णसंख्येसह मृत्यूच्या प्रमाणातही मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. राज्यात सहा हजार रुग्ण उपचाराधीन असून दैनंदिन बाधितांचे प्रमाणही जवळपास एक टक्क्यापर्यंत कमी झाले आहे.करोनाची तिसरी लाट जानेवारीमध्ये राज्यात वेगाने पसरत होती, त्यावेळी सरासरी दैनंदिन रुग्णसंख्या ३३ हजार ५०० होती. फेब्रुवारीमध्ये यात मोठय़ा प्रमाणात घट होऊन ती पाच हजारापर्यत कमी झाली. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख हजारांच्याही खाली गेला होता. मार्चमध्ये तर हा आलेख पाचशेपर्यत घटला आहे. जानेवारीत राज्यात १० लाख ३८ हजार रुग्ण नव्याने आढळले होते, तर फेब्रुवारीमध्ये यात मोठी घट झाली असून सुमारे १ लाख ४४ हजार रुग्ण आढळले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 मृतांच्या संख्येतही जानेवारीच्या तुलनेत जवळपास निम्म्याने घट झाली आहे. जानेवारीत राज्यात १ हजार ५२४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. फेब्रुवारीमध्ये मात्र हे प्रमाण ७३७ पर्यत घटले. मागील काही दिवसांमध्ये दैनंदिन मृतांची संख्याही दहापेक्षा कमी झाली आहे. राज्यात सध्या ६ हजार १०० उपचाराधीन रुग्ण असून सर्वाधिक २ हजार १७७ रुग्ण पुण्यात आहेत. त्या खालोखाल मुंबई, नगर,ठाणे, नाशिक आणि नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. देशभरात सध्या सर्वाधिक सुमारे २७ हजार उपचाराधीन रुग्ण केरळमध्ये आहेत. यानंतर मिझोरम आणि महाराष्ट्राचा समावेश आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid 19 third wave declining in maharashtra zws
First published on: 04-03-2022 at 03:42 IST