देशातील पाच राज्यांत पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकांपैकी उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर या तीन राज्यांत राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुका लढवणार असल्याचं ऱाष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी जाहीर केलं आहे. उत्तर प्रदेशप्रमाणेच गोव्यातही भाजपाच्या विरोधात वातावरण असल्याचे त्यांनी सांगितलं असून उत्तर प्रदेशात सत्ता परिवर्तन होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरातून बाहेर कधी पडणार आणि शरद पवार पंतप्रधान कधी होणार, असा सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पवारांच्या दाव्याचं समर्थन करत चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावर बोलताना संजय राऊत यांनी “त्यांना योग्य वेळी माहिती देऊ. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम उत्तम सुरू आहे. येत्या १३ तारखेला पंतप्रधानांसोबत होणाऱ्या बैठकीत ते सहभागी होतील. शरद पवार यांच्याइतकी राजकारणाची, समाजकारणाची आणि व्यक्तिमत्वाची उंची आधी गाठा. तुमच्यासारखी जी टेकाडं आहेत त्यांना सह्याद्री किंवा हिमालयाच्या उंचीशी स्पर्धा करता येणार नाही,” असं प्रत्युत्तर दिलं होतं.

शरद पवार पंतप्रधान कधी होणार?; चंद्रकांत पाटलांच्या प्रश्नाला राऊतांनी दिलं उत्तर; “तुमच्यासारखी जी टेकाडं आहेत त्यांना…”

यानंतर भाजपाने पुन्हा संजय राऊत यांना टोला लगावला आहे. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर तुम्ही खुर्च्याच उचला असा टोला लगावला आहे.

गेल्या वर्षी संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु असताना १२ खासदारांचं निलंबन करण्यात आल्याने विरोधकांकडून संसदेबाहेर निदर्शनं करण्यात येत होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तिथे हजेरी लावली होती. दरम्यान यावेळी शरद पवारांसाठी संजय राऊत खुर्ची आणत असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोवरुन विरोधकांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली होती.

संजय राऊत यांना पवारांसाठी खुर्ची घेऊन जात असल्याच्या व्हायरल फोटोवरुन भाजपा नेते टीका करत असल्यासंबंधी विचारण्यात आल्यावर, “लालकृष्ण अडवाणी जरी तिकडे असते तर मी त्यांनाही मी खुर्ची दिली असती. शरद पवारांची प्रकृती, त्यांचं वय, त्यांना होणारा त्रास…ते आंदोलनात माझ्यासोबत आले होते. त्यांना चालतानाही त्रास होत होता. त्यांना मांडी घालून बसता येत नाही. त्यांच्या पायाला त्रास आहे. अशावेळी महाराष्ट्रातील एका पितृतूल्य, वडिलधाऱ्या व्यक्तीला मी स्वत: खुर्ची आणून दिली हे जर कोणाला आवडलं नसेल तर ही महाराष्ट्राची संस्कृती नसून नवी विकृती आहे,” असे म्हटले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Criticism of bjp on shivsena sanjay raut for support ncp sharad pawar abn
First published on: 12-01-2022 at 14:24 IST