कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील ४० गावांनी महाराष्ट्रात येण्याचा ठराव केला आहे. गावांच्या या ठरावावर आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत, असे विधान केले आहे. बोम्मई यांच्या या विधानानंतर राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. उद्धव ठाकरे गटाने आम्ही सीमाप्रश्नासाठी लढा लढू. तुरुंगवास भोगू अशी भूमिका घेतली आहे. याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गटातील नेते तथा खासदार संजय राऊत यांनीदेखील शिंदे गटावर कठोर शब्दात टीका केली आहे. बंडखोर आमदारांचा स्वाभिमान आता कोठे गेले आहे, असा सवाल राऊत यांनी केला. राऊतांच्या याच टीकेला आता शिंदे गटातील नेते दादा भुसे यांनी प्रत्युतर दिले आहे. ते आज (२४ नोव्हेंबर) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

हेही वाचा >>> एकनाथ शिंदेंनी भविष्य पाहिल्यावरून अजित पवारांनी कान टोचले, हसत हसत म्हणाले, “ज्योतिषाकडे जाऊन…”

“जोपर्यंत आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत होतो, तेव्हा चांगले होतो. आता मात्र अचानकपणे आम्ही वाईट झालो, असे नसते. आम्ही काल जे होतो तेच आजही आहोत. भविष्यातही आम्ही असेच राहणार,” अशी प्रतिक्रिया दादा भुसे यांनी दिली.

संजय राऊत काय म्हणाले?

“स्वाभिमानासाठी आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो, असे बंडखोर आमदार सांगत होते. मात्र आता बाजुच्या राज्यातील एक मुख्यमंत्री आमची गावं खेचून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरे राज्य आमचे उद्योग खेचून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आता तुमचा स्वाभिमान कोठे शेण खायला गेला आहे. तुम्ही षंढासारखे तुम्ही बसले आहात,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

हेही वाचा >>>“मी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना धमकी देतोय, महाराष्ट्राकडे…”, संजय राऊतांचं मोठं विधान!

सरकार कमजोर, मिंधे, दुर्बल असेल पण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“महाराष्ट्राचं सरकार कमजोर, मिंधे, दुर्बल असेल. पण आजही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना महाराष्ट्रावर आलेलं प्रत्येक संकट परतवून लावेल. १०६ हुतात्मे झाले आहेत. आम्ही आणखीन हुतात्मे देऊ. रक्त सांडू. आम्हाला तुरुंगाची भीती नाही. शिवसेना हा एकमेव पक्ष आहे, ज्यानं ६९ हुतात्मे दिले आहेत. बाळासाहेबांनी तुरुंगवास भोगलाय, आम्हीही भोगू. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना मी शिवसेनेकडून इशारा नाही देत, धमकी देतोय समजा. महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहाल तर याद राखा. ‘हे घेऊ, ते घेऊ’ ही तुमची बकबक बंद करा. आजही आम्ही शांत आणि संयमी आहोत. आमचं सरकार जरी सिलेंडर वर करून गुडघ्यावर बसलं असलं, तरी शिवसेना स्वाभिमानाने उभी आहे हे विसरू नका”, अशा शब्दांत राऊतांनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे.