अलिबाग / Dahi Handi 2025 Celebration – मुंबई ठाण्यातीसल दहिहंडी उत्सवाचे लोण आता कोकणातही ठिकठिकाणी पहायला मिळू लागले आहे. या उत्सवाला राजकीय आश्रय प्राप्त झाल्याने रायगड जिल्ह्यातही ठिकठीकाणी लाखमोलाच्या दहिहंडी उत्सवांचे आयोजन केले जाऊ लागले आहे. मात्र अलिबाग तालुक्यातील कुर्डूस येथे दरवर्षी एका आगळ्या वेगळ्या दहिहंडी उत्सवाचे आयोजन केले जात आहे. हा दहिहंडी उत्सव त्यातील थरारामुळे लक्षवेधी ठरु लागला आहे.
गावातील विहीरीवर दहीहंडी बांधून ती उडी मारून फोडण्याची पंरपरा गावाने जोपासली आहे. १९९२ साली गावातील केणी, शेरामकर, पिंगळे या कुडूंबांनी या आगळ्या वेगळ्या दहिहंडी उत्सवाची सुरवात केली. हळुहळु संपुर्ण पंचक्रोशीत हा आगळा वेगळा दहिहंडी उत्सव आकर्षणाचा केंद्र बिंदु ठरू लागला.
गावातील मोठ्या भल्या मोठ्या विहिरीवर या दहिहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. गावातील लोक विहीरीवर गोलाकार बसून, गोविंदाला हाताच्या पंजावर उचलून, दहिहंडीच्या दिशेने उडवतात, त्यानंतर तो गोविंदा हवेत असतांनाच दहिहंडीला स्पर्ष करण्याचा प्रयत्न करतो. गोविंदाच्या हाताचा स्पर्ष झाला तर दहीहंडी फुटली असे समजले जाते. स्पर्ष झाला नाही तर दुसऱ्या पथकाला संधी दिली जात असते. गोविंदाची हवेतील उडी अचूक असणे गरजेचे असते, कारण गोविंदाने हंडी फोडणाऱ्या गोविंदाने विहीरीच्या मधोमध पाण्यात पडणे अपेक्षित असते. थोडी चूक झाली तर गोविंदा विहीरीच्या कठड्यावर आपटून तो जखमी होऊ शकतो. त्यामुळे गोविंदा पथकांमधील इतर सहकारी विहीरीच्या कठड्यावर बसून त्याचे संरक्षण करत असतात.
तुडूंब भरलेल्या विहीवर हवेत उडी घेूऊन हंडी फोडण्याचा थरार पहाणे हा एक विलक्षण अनुभव असतो, हंडी फोडणारा गोविंदा हा पट्टीचा पोहणारा असणे आवश्यक असते. या दही हंडी चे आयोजन देवळाली गोविंदा पथक कुर्डुस यांच्या मार्फत केले जाते , दरवर्षी मुंबई ठाणे नवीमंबई येथून या अनोख्या दहीहंडी उत्सवाला पाहण्यासाठी हजारो लोक या ठिकाणी येत असल्याचे आयोजक पराग पिंगळे सांगतात.