रत्नागिरी – दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अधिकृत ईमेल आयडीचा वापर करून विद्यापीठाच्या १२ निवृत्ती धारक कर्मचाऱ्यांचे एकूण ११ लाख ९४ हजार ९३३ रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २ जून २०२५ रोजी दुपारी २.५० मी. ते ५ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत या कालावधीत विद्यापीठाचे अधिकृत ईमेल आयडी हॅक करून त्याचा गैरवापर करण्यात आला. या ईमेल आयडीवरून बँकेच्या ई मेल आयडीमधे बदल करून मेल वरील एक्सेल शीट मधे बदल करून त्यात दुसरे खाते नंबर टाकून बनावट एक्सेल शीट एसबीआय बँक दापोली यांच्या मेल आइडी SBI (sbi.01047@sbi.co.in) वर पाठवले. नंतर हा मेल डिलीट करून त्यात बदल केला. या बनावट एक्सेल शीट द्वारे १२ खाते नंबर वर विद्यापीठाच्या १२ निवृत्ती धारक कर्मचाऱ्यांची एकूण ११ लाख ९४ हजार ९३३ रुपये उचलल्याचे स्पष्ट झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेची तक्रार विद्यापीठातील अधिकारी धनश्री दीपक सामंत यांनी केली आहे. आरोपी अज्ञात असून, त्यांनी फसवणुकीच्या उद्देशाने हा प्रकार केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. अशा प्रकारच्या फसवणुकीच्या प्रयत्नांमुळे सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सायबर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.