Dasara Melava: 'उद्धव यांचं आमंत्रण आल्यास मेळाव्याला जाणार' म्हणणाऱ्या राणेंना सेनेचं उत्तर; म्हणाले, "उद्या संध्याकाळपर्यंत..." | Dasara Melava Shivsena reply Narayan Rane over his comment of attending function if Uddhav Thackeray invite scsg 91 | Loksatta

Dasara Melava: ‘उद्धव यांचं आमंत्रण आल्यास मेळाव्याला जाणार’ म्हणणाऱ्या राणेंना सेनेचं उत्तर; म्हणाले, “उद्या संध्याकाळपर्यंत…”

नारायण राणेंच्या विधानावर पत्रकारांनी हसतच, “उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला पण जाणार?” असा प्रश्न विचारला.

Dasara Melava: ‘उद्धव यांचं आमंत्रण आल्यास मेळाव्याला जाणार’ म्हणणाऱ्या राणेंना सेनेचं उत्तर; म्हणाले, “उद्या संध्याकाळपर्यंत…”
राणेंच्या विधानावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आमंत्रण मिळालं तर आपण शिवाजी पार्कवरील उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जाईन असं म्हटलं होतं. नारायण राणेंच्या या विधानावर शिवसेनेनं पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या निलम गोऱ्हे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या विधानावर भाष्य केलं आहे.

नक्की वाचा >> Dasara Melava: “‘समृद्धी महामार्गा’वर सामान्यांना बंदी मग शिंदे समर्थकांना तो वापरण्याची परवानगी कोणी दिली? गुन्हे दाखल करा”

पत्रकारांशी संवाद साधताना नारायण राणेंना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. “आमंत्रण आलं तर सहभागी होणार. कोणीही आमंत्रण दिलं तर जाणार. उद्धव ठाकरेंनी आमंत्रण दिलं तरी जाणार,” असं राणेंनी हसत म्हटलं होतं. त्यावर पत्रकारांनी हसतच, “उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला पण जाणार?” असा प्रश्न विचारला. त्यावर राणेंनी, “आमंत्रण दिलं पाहिजे. पण मला माहिती आहे देणार नाही,” असं म्हटलं.

नक्की वाचा >> ‘‘खोके’वाल्यांचा अधर्म…’, ‘पुढच्या पिढीला कळणारदेखील नाही की, भाजपा…’; दसरा मेळाव्याआधीच उद्धव ठाकरेंकडून हल्लाबोल

“उद्धव ठाकरेंनी आमंत्रण दिलं तर दसरा मेळाव्याला येईल असं खोचक विधान नारायण राणेंनी केलं आहे,” असं म्हणत निलम गोऱ्हेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला. “बघू उद्या संध्याकाळपर्यंत काय होतंय ते,” असं निलम गोऱ्हे म्हणाल्या. “ठाकरे देतील त्यांना देतील का आमंत्रण?” असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर उत्तर देताना निलम गोऱ्हेंनी हसतच, “त्यांना उत्तर चांगलं माहित आहे की त्यांची कायमची हकालपट्टी केलेली आहे. तरी ते बोलत आहेत तर त्यांच्या मनामध्ये कुठेतरी दुगदुगी शिल्लक आहे असं दिसतंय,” असं उत्तर दिलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“सिद्धेश कदम वडिलांना बोलण्यापासून रोखत नसतील तर…”, किशोरी पेडणेकर संतापल्या; म्हणाल्या…

संबंधित बातम्या

Maharashtra Karnataka Dispute : शरद पवारांच्या ४८ तासांच्या अल्टिमेटमवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…
VIDEO: ‘अपना एक स्टाईल है, इलाका तुम्हारा और धमाका हमारा’, मनसेच्या इशाऱ्यावर सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…
“महाविकास आघाडीच्या बैठकीत ‘सकारात्मक’ चर्चा झाली म्हणजे फसवेगिरी…”, युतीबाबत प्रकाश आंबेडकरांची रोखठोख भूमिका
Maharashtra Karnataka Border Dispute : “हा संपूर्ण विषय मी अमित शाहांच्या कानावर घालणार आहे, कारण…”; देवेंद्र फडणवीसांचं विधान!
“त्यांची मुख्यमंत्रीपदाची हौस…”, महिला मुख्यमंत्रीबाबत उद्धव ठाकरेंच्या विधानावर चित्रा वाघ यांचा टोला

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Himachal Pradesh Election 2022 : अपक्ष उमदेवार ठरणार ‘किंगमेकर’?, भाजपा-काँग्रेसमध्ये सत्तेसाठी अटीतटीची लढाई!
सांगली : ‘त्या’ रानगव्याचा ह्दयविकाराच्या धक्क्याने मृत्यू; वाळवा तालुक्यात ऊसाच्या फडात आढळला होता जखमी अवस्थेत
तरुणींशी मैत्रीचे आमिष दाखवून ५३ वर्षीय व्यक्तीची फसवणूक; तरुणीसह तिघांना अटक
मुलगी अभिनेत्री अन् मुलगा बनणार लेखक; शाहरुख खानचा लेक आर्यन खान पदार्पणासाठी सज्ज
“त्यांची मुख्यमंत्रीपदाची हौस…”, महिला मुख्यमंत्रीबाबत उद्धव ठाकरेंच्या विधानावर चित्रा वाघ यांचा टोला