लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर जिल्ह्यात गडचिंचोली येथे झालेल्या साधूंच्या हत्याकांडप्रकरणी सक्तीच्या रजेवर पाठवलेले पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांची अखेर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी दत्तात्रेय शिंदे यांची पालघरच्या पोलीस अधीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

१६ एप्रिलच्या सायंकाळी गुजरातकडे निघालेल्या दोन साधू व त्यांच्या वाहनचालकाची कासा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गडचिंचले येथे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी दोन पोलीस अधिकारी व तीन पोलीस कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई यापूर्वी करण्यात आली होती. तसेच पालघरचे पोलिस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते.

दरम्यान पालघरचे पोलिस अधीक्षकपदी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड च्या कार्यकारी संचालकपदी असलेल्या दत्तात्रय शिंदे यांची नेमणूक गृह विभागाकडून आज करण्यात आली. यापूर्वी दत्तात्रय शिंदे यांनी यांनी सिंधुदुर्ग सांगली आणि जळगावचे जिल्हा पोलीस प्रमुख पदी काम पाहिले आहे.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dattatreya shinde appointed as new sp of palghar post lynching incident scj
First published on: 23-05-2020 at 19:34 IST