राज्यात १ डिसेंबरपासून इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचा शाळा सुरू होणार आहे. या पार्श्वभूनीवर आज शिक्षण विभागाने सर्व शाळांसाठी नियमावाली देखील जाहीर केली आहे. मात्र, नाशिकमध्ये सध्या पहिली ते सातवीपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत, असा निर्णय झालेला आहे. नाशिकचे महापालिका आयुक्त विलास जाधव यांनी याबाबत माहिती दिली आहे.

अफ्रिकेमध्ये करोनाचा नवा व्हेरिएंट समोर आला आहे. जगभरात या नव्या व्हेरिएंटचा संभाव्य धोका वार्तवला जात असतांना, दक्षिण अफ्रिकेत आयर्न मॅनच्या स्पर्धेसाठी गेलेले नाशिकचे दोन खेळाडू हे शहरात परतले आहेत. महापालिकेकडून या दोघांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त विलास जाधव यांच्याकडून देण्यात आली आहे. तर पहिली ते सातवीचे वर्ग सुरु करण्याबाबतचा निर्णय देखील १० डिसेंबरपर्यंत स्थगित ठेवण्यात आलेला आहे असे यावेळी सांगण्यात आले आहे.

मुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर अफ्रिकेत समोर आलेल्या करोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका आणि प्रादुर्भाभाव वाढू नये यासाठी राज्यातील सर्व महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तर, नाशिकमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आयर्नमॅनच्या स्पर्धेतून परतलेल्या दोन खेळाडूंचे स्वॅब तपासणीसाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून घेण्यात आले आहेत. त्यामुळे या दोघा खेळाडूंना करोनाच्या नव्या व्हेरिएंट ची लागण झाली आहे की नाही याकडे महापालिका वैद्यकीय विभाग लक्ष ठेऊन आहे, तर हे दोघे ज्यांच्या संपर्कात आले आहेत त्यांची देखील तपासणी केली जात असल्याची माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडून देण्यात आली आहे.

याच बरोबर पहली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय झाला होता. मात्र हा निर्णय आता १० तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती देखील नाशिक महापालिका आयुक्त यांनी दिली आहे .