राहाता : साईबाबांच्या शिर्डीत दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. दिवाळीच्या दिवशी साईंनी ज्या द्वारकामाईत पाण्याने दिवे प्रज्वलित केले होते, त्याच प्रांगणात शिर्डीच्या क्रांती युवक मंडळ, शिर्डी ग्रामस्थांसह भाविकांनी ११ हजार दिवे लावत ‘शंकर मेरे साईनाथ’ आणि ‘हॅप्पी दिवाळी’ या अक्षरांत दिवे प्रज्वलित करीत दीपोत्सव साजरा केला आहे.

शिर्डीत साईबाबांचे वास्तव्य या जागेत होते. या जागेचे साईबाबांनी द्वारकामाई असे नामकरण केले. साईबाबांच्या काळात संपूर्ण शिर्डी दिवाळीच्या दिवशी दिव्याच्या तेजाने झळाळत असताना बाबांची द्वारकामाई मात्र अंधारात होती. त्यामुळे बाबांची भक्त असलेली झिप्रीने द्वारकामाईत दिवे लावण्याचा आग्रह धरला. लहान मुलीच्या आग्रहाखातर साईबाबा तयार झाले. मात्र, त्यांना दिवे लावण्यासाठी कोणीही तेल दिले नाही. त्यामुळे बाबांनी पाण्याने दिवे पेटवले. पडक्या मशिदीत प्रकाश पाहून जो तो आश्चर्यचकित झाला, अशी आख्यायिका आहे. तेव्हापासून साईबाबांच्या शिर्डीत दीपावलीला एक वेगळं महत्त्व प्राप्त आहे.

दिवाळीत अनेक भक्त साईबाबांसोबत हा सण साजरा करण्यासाठी शिर्डीला येतात. शिर्डी ग्रामस्थांसह भाविकांनी द्वारकामाईच्या समोरील प्रांगणात ११ हजार दिवे लावत ‘शंकर मेरे साईनाथ’ आणि ‘हॅप्पी दिवाळी’ या अक्षरांत दिवे प्रज्वलित केले. साईबाबा मंदिरात पारंपरिक पद्धतीने दीपावली साजरी केली गेली. आकर्षक आकाश कंदील साईमंदिर परिसरात लावलेले आहेत. दिवाळीत दीप प्रज्वलित करून शिर्डीत बाबांच्या सान्निध्यात दिवाळी साजरी केली जाते. भक्तांनी लावलेल्या हजारो दिव्यांनी साईमंदिर लखलखून गेले आहे. साईबाबा मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने उजळला आहे. भक्तांचा सहभाग आणि सेवाभावातून साकारलेल्या या सजावटीमुळे शिर्डीचे वातावरण अधिकच तेजोमय व भक्तिमय झाले आहे.

साईमंदिरात आज, मंगळवारी सायंकाळी दिवाळीनिमित्त पारंपरिक पद्धतीने लक्ष्मी-कुबेर पूजन करण्यात आले. शिर्डीत साईबाबांचे वास्तव्य या जागेत होते. या जागेचे साईबाबांनी द्वारकामाई असे नामकरण केले. साईबाबांच्या काळात संपूर्ण शिर्डी दिवाळीच्या दिवशी दिव्याच्या तेजाने झळाळत असताना बाबांची द्वारकामाई मात्र अंधारात होती. त्यामुळे बाबांची भक्त असलेली झिप्रीने द्वारकामाईत दिवे लावण्याचा आग्रह धरला. लहान मुलीच्या आग्रहाखातर साईबाबा तयार झाले. मात्र, त्यांना दिवे लावण्यासाठी कोणीही तेल दिले नाही. त्यामुळे बाबांनी पाण्याने दिवे पेटवले. पडक्या मशिदीत प्रकाश पाहून जो तो आश्चर्यचकित झाला, अशी आख्यायिका आहे. तेव्हापासून साईबाबांच्या शिर्डीत दीपावलीला एक वेगळं महत्त्व प्राप्त आहे.