अलिबाग- महाड येथे भिलारे मैदान येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान आमदार भरत गोगावले यांनी बोलताना, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या स्नेहल जगताप यांचे नाव न घेता अपशब्द वापरले. आमदार गोगावले यांच्या या वक्तव्यांचे तीव्र पडसाद आज महाड शहरात उमटले. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या महिला आघाडीने आमदार गोगावले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

आमदार भरत गोगावले यांच्या पुढाकाराने, शुक्रवारी महाड येथे महिला स्वयम रोजगारासाठी महिलांसाठी मिक्सर वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना आमदार गोगावले यांनी बोलण्याच्या ओघात अपशब्द वापरले. गोगावले यांच्या वक्तव्याची चित्रफीत शनिवारी समाज माध्यमांवर प्रसारीत झाली. यानंतर महाड शहरात याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने या वक्तव्याचा निषेध केला. एकीकडे महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवायची आणि दुसरीकडे महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करायची ही बाब निंदनिय असल्याचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या आणि महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी म्हटले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पक्ष प्रतोद गोगावले यांच्या या वक्तव्याचे समर्थन करणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा – सुशीलकुमारांचे नातेवाईकही शरद पवार गटाकडे इच्छुक

दरम्यान या वक्तव्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या महाड शहर महिला आघाडी प्रमुख तृप्ती पाटील यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात जाऊन आमदार गोगावले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत लेखी मागणी केली आहे. यावेळी धनंजय देशमुख, बंटी पोटफोडे, प्रमोद महाडीक, मंगेश देवरुखकर, वर्षा काळप, निता शेठ, गितांजली मोरे यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात जाऊन आमदार गोगावले यांच्यावर कारवाईची मागणी केली. यावेळी महिला आक्रमक झाल्या होत्या.

हेही वाचा – Raj Thackeray Podcast: “महाराष्ट्राचं सोनं कधीच लुटलं, उरली फक्त…”, राज ठाकरेंचा हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बाळासाहेबांच्या तालमीत, अनंत दिघे यांच्या मुशीत तयार झालेला मी कार्यकर्ता आहे. मी वक्तव्य करताना कोणाचेही नाव घेतलेले नाही. गावठी भाषेत बोलताना एखादा शब्द निघून गेला असेल, मात्र कोणाचा अपमान करण्याचा त्यात हेतू नव्हता. त्यामुळे मनाला लावून घेण्याचे कारण नाही, अशी प्रतिक्रिया आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे.