Dvenedra Fadnavis महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. पुढच्या महिन्यातल्या २० तारखेला मतदान आणि २३ तारखेला निकाल लागणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात सरकार कुणाचं बसणार हे स्पष्ट होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचं सरकार येईल असा दावा केला आहे. तसंच गरज पडल्यास शरद पवार किंवा उद्धव ठाकरेंची मदत घेणार का? या प्रश्नाचं उत्तरही देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी दिलं आहे.
विधानसभा निवडणुकीत फेक नरेटिव्ह चालणार नाही
हरियाणाबाबत सगळे पोलपंडीत सांगत होते भाजपाचा दारुण पराभव होणार. पण भाजपाला प्रचंड बहुमत मिळाली. त्यामुळे सकाळी टीव्हीसमोर बोलणारे दुपारी काय बोलू या संभ्रमात पडले होते. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला काही प्रमाणात यश मिळवता आलं. फेक नरेटिव्हच्या भरवशावर त्यांनी यश मिळवलं. आमच्यात फक्त पॉईंट ३ पर्सेंटचा फरक होता. फेक नरेटिव्ह आम्ही उघडा पाडला. लोकांच्या लक्षात आलं की ते खोटं बोलत होते. राहुल गांधींनी आरक्षण कसं संपवणार याचा फॉर्म्युला सांगितला. नाना पटोले त्यांचीच रि ओढत आहेत. तसंच लोकसभेच्या निवडणुकीत व्होट जिहाद हा महत्त्वाचा घटक होता. सगळी धार्मिक स्थळं आणि धर्मगुरु व्होट जिहादचा नारा देत होते. आता याचा फायदा होणार नाही. तसंच व्होट जिहादमुळे बहुसंख्य समाजाच्या लक्षात आलं की मोदी नकोत म्हणून व्होट जिहाद करणार असेल तर मतपेटीतून उत्तर देता येईल. त्यामुळे फेक नरेटिव्ह आता चालणार नाही. असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले. एनडीटीव्ही मराठी कॉनक्लेव्हमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
लाडकी बहीण योजनेवर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“लाडकी बहीण योजनेबाबत मी हे सांगू इच्छितो की आमच्या विरोधकांचं कन्फ्युजन बघा. लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कोलमडणार, निवडणुकीनंतर योजना बंद होणार. दुसरीकडे तेच भाषणांमध्ये सांगतात की हे १५०० रुपये देतात आम्ही निवडून आलो तर २००० रुपये देऊ. यांच्याकडे खजिना आहे का? पैशांचं झाड आहे? एक काहीतरी म्हणा योजना बंद होणार आहे किंवा योजना चालते आहे आम्ही चालवणार आहोत. आमचे विरोधक तर लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी कोर्टातही गेले आहेत. प्रयत्न करुन पाहिला पण मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील अर्थसंकल्प सर्वात मोठा अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्रात सोशल सेक्टरची योजना केली तर ते सस्टेन करण्याची महाराष्ट्राची ताकद आहे. लाडकी बहीण योजना हवेत आणलेली नाही. या योजनेची अर्थसंकल्पात तरतूद आहे. त्याची आकडेवारी सगळ्यांसमोर आहेत. इतर योजनांचीही माहिती आहे. त्यामुळे बजेटमध्ये बसवून दिलेली योजना बंद पडण्याचं कारण नाही. निवडणुकीनंतरही ही योजना आम्ही चालवणारच आहोत. विरोधकांनी काहीही प्रयत्न केले तरीही लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे.” असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे.
गरज पडल्यास कुणाचा पाठिंबा घेणार उद्धव ठाकरे की शरद पवार?
निवडणुकीनंतर गरज पडल्यास कुणाचा पाठिंबा घेणार उद्धव ठाकरे की शरद पवार? असा प्रश्न विचारल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “निवडणूक निकालानंतर फक्त एकनाथ शिंदे, अजित पवार, रामदास आठवलेंची मदत घेणार यांच्याच मदतीने महायुतीचं सरकार स्थापन होणार.”असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले