"सत्यजित तांबेंना संधी द्या, नाहीतर...", बाळासाहेब थोरातांसमोर देवेंद्र फडणवीसांची फटकेबाजी | devendra fadnavis offer bjp satyajeet tambe front balasaheb thorat over book Book Release Ceremony | Loksatta

“सत्यजित तांबेंना संधी द्या, नाहीतर…”, बाळासाहेब थोरातांसमोर देवेंद्र फडणवीसांची फटकेबाजी

“राजकीय कार्यकर्त्यांमध्ये जे वेगळेपण असते, ते सत्यजित मध्ये…”

“सत्यजित तांबेंना संधी द्या, नाहीतर…”, बाळासाहेब थोरातांसमोर देवेंद्र फडणवीसांची फटकेबाजी
देवेंद्र फडणवीस ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी मराठीत अनुवाद केलेल्या ‘सिटीझनविल’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज ( ७ डिसेंबर ) संपन्न झाला. कॅलिफोर्निया राज्याचे गव्हर्नर, गॅविन न्यूसम यांनी लिहलेल्या ‘सिटीझनविल’ या पुस्तकाचं सत्यजित तांबे यांनी अनुवाद केला. या पुस्तकप्रकाशन सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर उपस्थित होत्या. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे.

हेही वाचा : तुम्ही काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा आदेश का धुडकावला? सत्यजीत तांबे म्हणाले, “अनेक दिवसांपासून…”

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सत्यजित तांबे यांना मी अनेक वर्षांपासून बगत आहे. राजकीय कार्यकर्त्यांमध्ये जे वेगळेपण असते, ते सत्यजित मध्ये पाहायला मिळत. आशिषजी यांना प्रश्न पडला, सत्यजित तांबे परदेशात का शिकायला गेले? पण, आपल्या लोकशाहीत सर्व निर्णय राजकीय नेते घेतात. त्यामुळे ते जेवढे प्रगल्भ आणि माहिती ठेवणारे असतील, तेवढे चांगले निर्णय घेतात.”

हेही वाचा : “शरद पवार तिकडे जाऊन काय दिवे लावणार?” सीमावादावरून विजय शिवतारेंचा खोचक टोला

पुढं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, “बाळासाहेब थोरात तुमच्याकडे एक तक्रार आहे. सत्यजित सारखे नेते, तुम्ही कितीदिवस बाहेर ठेवणार आहात. सत्यजितला जास्त दिवस बाहेर ठेऊ नका, नाहीतर आमची नजर त्यांच्यावर आहे. कारण, चांगली माणसं जमाच करायची असतात,” असे म्हणत फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे सत्यजित तांबेंना एकप्रकारे भाजपात येण्याची ऑफरच दिली.

हेही वाचा : “मी मरेपर्यंत…”, गिरीश महाजनांच्या टीकेला एकनाथ खडसेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

अजित पवारांची कार्यक्रमाला दांडी

मागील काही दिवसांपासून उद्योग, सीमावाद, शेतकऱ्यांना अटीवृष्टीची मदत या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुंपली आहे. त्यात आजच्या ‘सिटीझनविल’ पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार एकाच मंचावर येणार होते. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस पण, अजित पवारांनी दांडी मारल्याचं दिसून आलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 21:56 IST
Next Story
अर्थतज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांचे निधन