Devendra Fadnavis On Next CM : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होईल. सरकार स्थापन करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये मोठ्या हालचाली सुरु आहेत. मात्र, अद्याप सत्तास्थापनेला मुहूर्त लाभलेला नाही. मुख्यमंत्री कोण होणार? यावरून महायुतीत रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यामध्ये शिवसेना (शिंदे) मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसली असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सत्तास्थापनेचा पेचप्रसंग निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या सर्व घडामोडीसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत सूचक भाष्य केलं. ‘सर्व चर्चांवर लवकरच उत्तर मिळेल. तसेच आधी मुख्यमंत्री ठरेल. मग मुख्यमंत्री हे मंत्री ठरवतील’, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्रि‍पदाबाबत अनेक चर्चा सुरु आहेत. मात्र, अद्याप मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत भाष्य केलं. फडणवीस म्हणाले की, “मुख्यमंत्रि‍पदाबाबतच्या चर्चांना लवकरच आपल्याला उत्तर मिळेल. महायुतीमधील तिन्ही पक्ष मिळून या संदर्भातला निर्णय लवकरच घेतील. आमच्या पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांशी चर्चा सुरु आहेत, आपल्याला लवकरच याचं उत्तर मिळेल”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

हेही वाचा : ‘एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाहीत’, शिंदे गटाच्या नेत्याचे विधान; मुख्यमंत्रीपदाचा पेच वाढणार?

मुख्यमंत्रि‍पदाबाबत जशी चर्चा सुरु आहे, तशीच चर्चा राज्यातील वेगवेगळ्या आमदारांनाही मंत्रि‍पदाची अपेक्षा लागली आहे. यासंदर्भात अनेकांना उत्सुकता लागली आहे. या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, “आधी मुख्यमंत्री ठरेल. मग त्यानंतर मुख्यमंत्री हे मंत्री ठरवतील. त्यामुळे आधी आपण मुख्यमंत्र्यांची वाट पाहावी. त्यानंतर मंत्र्यांची देखील नाव आपल्या समोर येतील”, असं सूचक उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाविकास आघाडीला प्रत्युत्तर

विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या अपयशानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी ईव्हीएमच्या विरोधाक मोठं जनआंदोलन उभारणार असल्याचं सांगितलं आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “विरोधकांना याचं उत्तर सर्वोच्च न्यायालयाने दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे देखील सांगितलं की, तुमचा पराभव झाला तर ईव्हीएम वाईट ही पद्धत बंद करा. ईव्हीएम हे सुरु राहणार आहे हे न्यायालयाने सांगितलं आहे. त्यामुळे विरोधकांनी रडीचा डाव बंद केला पाहिजे”, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.