पुण्यातील भीमा-कोरेगाव विजयस्तंभ येथे २०१८ साली दंगल झाली होती. याप्रकरणी भीमा-कोरेगाव आयोगासमोर चौकशी सुरू आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आयोगाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसाठी बोलवण्यास सांगितलं आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.

प्रकाश आंबेडकरांची मागणी काय?

“आयोगाने मला बोलण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसासाठी बोलवावे. तसेच, २०१८ साली राज्याचे मुख्य सचिव असलेले सुमित मल्लिक आणि पोलीस ग्रामीणचे तत्कालीन पोलीस आयुक्त सुवेझ हक यांनाही चौकशीसाठी आयोगाने पाचारण करावे,” असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

prakash ambedkar uddhav thackeray sharad pawar
“फुटलेल्या पक्षांनी आपली ताकद पाहून…”, प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरे, शरद पवारांना टोला; जागावाटपावर म्हणाले…
Jayant Patil on Ajit Pawar comparision to Modi- Shah
‘तुलना कुणाशी करायची, याचं भान…’, अजित पवारांच्या ‘त्या’ दाव्यानंतर जयंत पाटील यांचा टोला
arvind kejriwal
केजरीवाल यांची क्षमायाचना
Uddhav Thackeray
“उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह पुन्हा मिळू शकतं”, SC च्या वकिलांनी केलं स्पष्ट; म्हणाले…

हेही वाचा : शरद पवारांच्या मध्यस्थीनंतरही शिरूर मतदारसंघाचा तिढा सुटेना? विलास लांडेंच्या वक्तव्यानंतर चर्चेला पुन्हा सुरुवात

“आयोगाची कार्यकक्षा ठरलेली आहे”

याबद्दल मुंबईत प्रसारमाध्यांनी देवेंद्र फडणवीसांना विचारल्यावर ते म्हणाले, “याबाबत लोकांनी यापूर्वीही अर्ज केले होते. त्यावर आयोगाला जो निर्णय घ्यायचा होता, तो घेतला आहे. आयोगाची कार्यकक्षा ठरलेली आहे.”

हेही वाचा : “अर्थमंत्री असताना अजित पवारांनी…”, ‘त्या’ विधानावरून शिंदे गटातील खासदाराचा गंभीर आरोप

“राजकारणाची दिशा भटकवण्यासाठी अन्…”

“प्रकाश आंबेडकर हे निष्णात वकील आहेत. प्रकाश आंबेडकरांना माहिती आहे, आयोगासमोर कोणाला बोलवावं आणि कोणास बोलवू नये. पण, राजकारणाची दिशा भटकवण्यासाठी आणि लक्ष दुसरीकडे वेधण्याकरता अशा प्रकारची विधाने प्रकाश आंबेडकर करत असतात,” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली.